शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

शस्त्र चालविणारे हात वळले स्वयंरोजगाराकडे; बचत गटांतून आत्मनिर्भरतेचा मार्ग

By संजय तिपाले | Updated: March 13, 2023 10:41 IST

नवजीवन उत्पादक संघाद्वारे विक्री व्यवस्था

गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणाच्या महाविस्तीर्ण दंडकारण्य जंगलात ते लहानाचे मोठे झाले. गरीब, आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींचे वय शिक्षण घेण्याचे, पण पेन, पुस्तकाची जागा शस्त्रांनी घेतली होती. काही कुटुंबांनी नक्षल चळवळीचा मार्ग सोडला अन् पोलिसांना शरण येणे पसंत केले. पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेद्वारे आता ते शहरात स्थिरावले आहेत. ज्या हातांनी एकेकाळी शस्त्र चालविले तेच हात आता स्वयंरोजगाराकडे वळले असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागले आहे.

कहाणी आहे मनीषा व महागू वड्डे या जोडप्याची. मुरखळा (नवेगाव) येथील नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पण करणारी ७० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. यापैकीच एक वड्डे दाम्पत्य. या वस्तीतील सर्वात टोलेजंग घर याच जोडप्याचे.

मनीषा यांचे शिक्षण जेमतेम पाचवी तर महागू हे आठवी शिकलेले. मनीषा जुगनूराम कुडचामी या रानगट्टा (ता. कोर्ची ) तर महागू चमरु वड्डे हे कुदरी (ता. एटापल्ली) गावचे रहिवासी. वयाच्या १४ - १५ व्या वर्षी दोघेही नक्षली चळवळीकडे वळले.

चपळ शरीर, नक्षली चळवळीसाठी जीव धोक्यात घालून रोजची जगण्या-मरण्याची लढाई. महाकाय जंगलखोऱ्यात वास्तव्य, पोलिसांशी चकमक, एके ४७ सारखे शस्त्र चालविण्याचे कसब असा त्यांचा दिनक्रम होता. २००९ मध्ये चळवळीत आलेल्या महागू वड्डे यांना कर्तव्यनिष्ठा पाहून २०१६ मध्ये कमांडर म्हणून बढती दिली गेली. याच काळात त्यांना डेप्युटी कमांडरचे सुरक्षारक्षक म्हणून नेमले गेले. २०११ मध्ये महागू व मनीषा यांची तिपागड जंगलात पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१५ मध्ये कसनसूर येेथे त्यांचा विवाह पार पडला. पुढे त्यांचे मनपरिवर्तन झाले व २०१९ मध्ये त्या दोघांनी एटापल्लीच्या हालेवारा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांकडून मनीषा यांना सव्वा पाच लाख रुपये व महागू यांना सात लाख रुपये बक्षीस मिळाले.

बचत गटातून उन्नतीचा मार्ग

महागू यांना पोलिसांनी रोजगार मिळवून दिला आहे तर मनीषा या बचत गट चालवितात. शिवशक्ती शाम सहायता समूह या बचत गटाच्या त्या अध्यक्षा असून एकूण १० महिलांचा यात सहभाग आहे. जानेवारी २०२३ मध्ये या बचत गटाची सुरुवात झाली. मनीषा यांच्याप्रमाणे इतर महिलांनीही बचत गटातून प्रगतीचा मार्ग जोखला आहे.

आत्मसमर्पणानंतर पुन्हा एकदा बोहल्यावर

२०२० मध्ये पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा लावला होता. यात पुन्हा एकदा मनीषा व महागू हे बाेहल्यावर चढले. विवाहानंतर वर्षभरातच त्यांना आदीम आवास योजनेतून घरकुल मिळाले. स्वत:जवळील काही पैसे टाकून त्यांनी सिमेंट क्राँक्रीटचे घर बांधले, दारात दुचाकीही आली आहे.

उत्पादन ते विक्रीची साखळी

नवजीवन वसाहतीत तीन बचत गट आहेत. यापैकी एक बचत गट फिनाइल (स्वच्छतेसाठीचे द्रव) बनवतो. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पोलिसांनी नवजीवन उत्पादक संघ स्थापन केला आहे. याद्वारे हे फिनाइल शासकीय कार्यालयांसह खासगी व्यापाऱ्यांना विक्री केले जाते. यामुळे उत्पादन ते विक्री अशी साखळी तयार झाली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली