शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हायप्रोफाईल 'लेडी किलर'ची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त !

By संजय तिपाले | Updated: June 8, 2024 17:28 IST

भूमाफियांशी हितसंबंध: पैशाच्या हव्यासाने चुकली आयुष्याची 'रचना'

गडचिरोली: सुमारे ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी सुपारी देऊन वृध्द सासऱ्याची थंड डोक्याने हत्या केल्याच्या आरोपाखाली येथीलनगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिला ६ जून रोजी नागपूरात अटक झाली. या हायप्रोफाईल'लेडी किलर'ची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापायी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने सासऱ्याला संपविल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. शहराची रचना ठरविणाऱ्या अर्चना पुट्टेवारने गुन्हेगारी पाऊल उचलून स्वत:च्या आयुष्याचीच 'रचना' चुकविली, अशी चर्चा आहे.

पुट्टेवार परिवारात तब्बल ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद सुुरु होता. २२ मे रोजी नागपुरात मानेवाडा चौकालगत कारच्या धडकेने पुरुषोत्तम पुट्टेवार (८२,रा.शुभनगर , मानेवाडा) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती नोंद करुनच तपास केला, पण चौकशीत हा घातपात असल्याचे उजेडात आले. त्यानंतर याचे धागेदोरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून व गडचिरोली येथील नगररचना विभागात सहायक संचालक पदावर असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यापर्यंत असल्याचे समोर आले. तिने चालक सार्थक बागडे यास सुपारी देऊन सचिन धार्मिक व नीरज उर्फ नाईंटी निमजे या दोहोंच्या मदतीने थंड डोक्याने कट रचून सासऱ्यास संपविल्याचे उघडकीस आले. अर्चनाचा पती मनीष डॉक्टर असून सासू शकुंतला यांचे ऑपरेशन झाल्याने दवाखान्यात होत्या. पत्नीला भेटून घरी जाताना पुरुषोत्तम यांना कारने धडक देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, अर्चना पुट्टेवार ही सध्या पोलिस कोठडीत आहे.

जमीन एनएसाठी करण्यासाठी रेटकार्डजमिनीचा वापर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चरकरता (एनए)करायचा असेल तर नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवान्यासाठी सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिचे दर ठरलेले होते, अशी माहिती प्लॉटिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली. फाईलवर 'वजन' ठेवल्याशिवाय ती पुढे सरकतच नव्हती. दररोज नगररचना कार्यालयात याद्वारे मोठी 'उलाढाल' होत असे. हेकेखोर स्वभावाच्या अर्चना पुट्टेवारचे कार्यालयीन सहकाऱ्यांशीही फारसे पटत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

वरिष्ठ कार्यालयात तक्रारी, पण कारवाई नाहीचअर्चना पुट्टेवार हिची कार्यपध्दती वादग्रस्त होती, त्यामुळे तिच्याबद्दल अनेक तक्रारी नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, या तक्रारींची ना चौकशी झाली ना कारवाई. तक्रारी दडपण्यासाठी ती वजन वापरत असे, त्यामुळे या तक्रारींवर कुठलीही कारवाई होत नसे. वरिष्ठ कार्यालयात तिला पाठीशी घालणारे कोण, याची चर्चा आहे.

पूररेषेतही एनए परवाने कसे ?दरम्यान,गडचिरोली शहराजवळील नवेगाव, मुडझा, कोटगल या भागालगत वैनगंगा नदी आहे. हा परिसर पूररेषेत येतो. मात्र, येथे भूमाफियांना हाताशी धरुन एनए परवाने वाटण्याचा प्रताप अर्चना पुट्टेवार हिच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. भूमाफियांना तिने संरक्षण दिल्यानेच पूररेेषेतील प्लॉटिंगलाही सोन्याचा भाव आला, या धोकादायक परिसरात मोठे इमले उभे राहिले. तिच्या कार्यकाळात दिलेल्या एनए परवान्यांची चौकशी झाल्यास मोठे गैरव्यवहार उजेडात येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोलीnagpurनागपूर