शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

थातुरमातूर काम करून १० लाख उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:58 PM

जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाअंतर्गत तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम थातुरमातूर काम करून सदर काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले व संबंधित कंत्राटदाराने सदर कामाचे १० लाख रूपयांच्या देयकाची उचल केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

ठळक मुद्देढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम : धानोरा येथील जि.प. बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

आॅनलाईन लोकमतधानोरा : जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाअंतर्गत तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम थातुरमातूर काम करून सदर काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले व संबंधित कंत्राटदाराने सदर कामाचे १० लाख रूपयांच्या देयकाची उचल केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या पेंढरी परिसरातील ढोरगट्टा-खरगी-पयडी या ग्रामीण मार्गाची दुरूस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी १६ लाख ६७ हजार रूपयांचा निधी प्रशासनाकडून मंजूर झाला. सदर रस्त्यावर ४० मिमीची बोल्डर व गिट्टी टाकून मजबुतीकरण करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केला होता. मात्र धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संगणमत करून सदर रस्त्याचे थातुरमातूर काम उरकून घेतले. संबंधित कंत्राटदाराच्या नावे १० लाख रूपयांचे देयक काढून ते त्याला अदा करण्यात आल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा शासनाचा मुख्य हेतू आहे. सदर हेतू पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर योजनेतून शासन निधीची तरतूद करीत आहे. मात्र संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदारांमध्ये मधूर संबंध असल्याने धानोरा तालुक्यात अनेक रस्त्यांचे अशाच प्रकारे थातुरमातूर काम करून शासकीय निधीची वासलात लावण्याचा सपाटा सुरू आहे. ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे थातुरमातूर काम करून १० लाख रूपयांचे देयक काढण्यात आले आहे. सदर देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर मार्गावर यापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. त्याच खडीकरणावर पुन्हा काही ब्रास मुरूम टाकून या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली.सदर रस्त्याच्या दुरूस्ती कामात दर्जा नसल्याने लवकरच या मार्गाची दुरवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकामाकडे जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने थातुरमातूर काम करणाºया अनेक कंत्राटदारांचे चांगलेच फावले आहे. परिणामी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.जि.प.च्या सभेत मुद्दा उचलणार- दुल्लमवारधानोरा तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्थानिक निधीतून मंजूर करण्यात आले. मात्र उपविभागाचे अभियंते व कंत्राटदारांनी संगणमत करून हे काम थातुरमातूर उरकून घेतले. संबंधित काम करवून घेणाऱ्या भ्रष्ट अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी आपण जि.प. च्या सभेत करणार आहोत. याशिवाय सदर मुद्दा आपण जि.प. प्रशासनाकडे लावून धरणार, अशी माहिती गट्टा-पेंढरी जि.प. क्षेत्राचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. सदर कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण जि.प. च्या सभेत आग्रहीपणे करणार आहोत, असेही ते म्हणाले. एक लाख रूपयांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.ढोरगट्टा-खरगी-पयडी या रस्त्याच्या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) कार्यालयात उपलब्ध नाही. आपण सध्या गडचिरोली येथील जि.प. बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात आहो. येत्या दोन-तीन दिवसात धानोरा येथील कार्यालयात आल्यानंतर या कामाची संपूर्ण माहिती दिली जाईल.- आर.डी. वाघाडे, प्रभारी उपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, धानोरा