लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : आरमोरी विधानसभा क्षेत्राची शेतकरी सन्मान व सीएम चषक स्पर्धेचे आयोजन कोरची येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्याकडे भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर यांच्या हस्ते होणार होते. अध्यक्षस्थानी खा.अशोक नेते तर विशेष अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सर्व पुढाऱ्यांच्या नावांचा कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख होता. मात्र त्यांनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे ऐनवेळी या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सदस्य किसन नागदेवे यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे होते. याप्रसंगी मंचावर राजू जेठानी, ज्योती नैताम, रामभाऊ लांजेवार, विलास गावंडे, विलास गोटेफोडे, नसरू भामानी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी श्रीराम विद्यालय व मोरेश्वर फाये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेण्यात आला. संचालन प्राचार्य देवराव गजभिये, प्रास्ताविक आनंद चोबे तर आभार प्रदर्शन कमलनारायन खंडेलवाल यांनी केले.
सीएम चषक स्पर्धेकडे पुढाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:59 IST
आरमोरी विधानसभा क्षेत्राची शेतकरी सन्मान व सीएम चषक स्पर्धेचे आयोजन कोरची येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्याकडे भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
सीएम चषक स्पर्धेकडे पुढाऱ्यांची पाठ
ठळक मुद्देकार्यक्रमस्थळी नाराजीचा सूर : जि.प. सभापतींच्या उपस्थितीत उद्घाटन