शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा आली इंग्रजी, भूगोलाचे पुस्तकही उघडले नाही

By admin | Updated: March 6, 2015 01:25 IST

१० वीची परीक्षा सध्या सुरू झाली आहे. मात्र जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा येथील पोस्टबेसीक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभरात इंग्रजी, विज्ञान, भूगोल

जिमलगट्टा : १० वीची परीक्षा सध्या सुरू झाली आहे. मात्र जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा येथील पोस्टबेसीक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभरात इंग्रजी, विज्ञान, भूगोल या तीन विषयाचे पुस्तकही शिक्षक नसल्याने उघडून पाहिले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १० वीचे वर्ष हे जीवनातील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाची पायरी समजली जाते. देचलीपेठा येथील पोस्ट बेसीक आश्रमशाळेत संपूर्ण वर्षभर इंग्रजी, भूगोल या दोन विषयाचा अभ्यासक्रम शिकविण्यातच आला नाही. विज्ञान व हिंदीचे प्रत्येकी तीन व चार धडे शिकविण्यात आले. इंग्रजी व विज्ञानाचे पुस्तकही उघडून पाहण्यात आले नाही. पूर्ण वर्षभर एकही तास या विषयांचे झाले नाही. त्यामुळे या दोन विषयाचे पेपर सोडवायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मागील वर्षी २०१३-१४ मध्ये इंग्रजी, भूगोल या विषयाचे शिक्षक उपलब्ध होते. त्यांची बदली विभागीय स्तरावरून करण्यात आली व त्यांच्या जागी अजूनपर्यंत दुसरे शिक्षक नियुक्त करण्यात आले नाही. दुर्गम भागात बदली करताना प्रथम बदली शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षकाची नियुक्ती करून बदली झालेल्या शिक्षकांना सोडायला मूभा देण्याचा प्रघात आहे. परंतु देचलीपेठा आश्रमशाळेतील इंग्रजी व विज्ञान शिक्षकाबाबत असे करण्यात आले नाही. त्यामुळे ८ वी, ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान झाले. या शाळेत शिक्षकाअभावी काहीच शिकविण्यात आले नाही. त्यामुळे अनेक पालक आत्ताच आपल्या पाल्याची टीसी काढण्याच्या तयारीला लागले आहे. देचलीपेठा आश्रमशाळेत यंदा विद्यार्थी राहण्याची शक्यता कमी आहे. (वार्ताहर)