शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

दहा हजारांवर नवागतांचे होणार स्वागत

By admin | Updated: June 26, 2017 01:02 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र

मंगळवारी शाळेची पहिली घंटा : प्रवेशोत्सवासाठी शिक्षण विभागाची सज्जता लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये इयत्ता पहिलीत एकूण १० हजार ४५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. २७ जून रोजी यंदा शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढून मंगळवारला या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. पटावर नोंदविण्यात आलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क या कायद्याने मान्य केला आहे. दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील, त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे, शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असल्यास सुट्यानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल तसेच यंदा प्रथमच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवारला शाळेमध्ये आनंदी वातावरण राहणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ जून २०१५ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. गावातून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यात सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांना भोजनात गोड पदार्थ मिळणार शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रमासोबतच इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या भोजनात गोड पदार्थाचा समावेश करावा, असे शालेय शिक्षण विभागाने ९ जून २०१५ रोजी काढलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खायला मिळणार आहे. १३२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश जि. प. प्र्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सर्वच केंद्रांमध्ये वर्षातून पाच ते सहा वेळा शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम शिक्षक तसेच गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत राबविली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ६६ मुले व ६६ मुली अशी एकूण १३२ शाळाबाह्य विद्यार्थी शोधून काढण्यात आले. त्यांचा शाळांमध्ये प्रवेशही निश्चित झाला आहे. या विद्यार्थ्यांचेही मंगळवारी स्वागत होणार आहे.