शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

अतिक्रमण करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: April 27, 2017 01:15 IST

३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासंबंधी कारवाई करण्याकरिता देसाईगंज शहरातील २०० वर

देसाईगंज : आमदारांची अधिकाऱ्यांशी चर्चा देसाईगंज : ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासंबंधी कारवाई करण्याकरिता देसाईगंज शहरातील २०० वर व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यामुळे या अतिक्रमणधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर आ. क्रिष्णा गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा येथील अधिकाऱ्यांना चर्चेकरिता बोलाविले व महामार्गावरील अतिक्रमण सध्या काढू नका, त्याला तात्पुरती स्थगिती द्या, अशी सूचना केली. देसाईगंज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी वरील अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग भंडारा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर महामार्ग प्राधिकरणाने कुरखेडा-आरमोरी मार्गावरील शहराच्या बसस्थानकापासून तर विश्रामगृहापर्यंतच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात २४ एप्रिल रोजी नोटीस बजाविली होती. त्यामुळे २०० वर व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट येणार होते. शहराच्या बाहेरून बायपास मार्ग मंजूर असताना शहराच्या मध्यातून महामार्गाची बांधणी का करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अतिक्रमण काढण्याच्या संबंधाने महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शहरात सर्वे करण्यासाठी आले, याची माहिती आ. क्रिष्णा गजबे यांना मिळताच, त्यांनी या अधिकाऱ्यांशी एक तास चर्चा केली व या चर्चेदरम्यान मार्ग बांधकामासाठी निधी सध्या उपलब्ध नाही. केवळ तक्रारीमुळे आम्ही अतिक्रमण काढण्यासंबंधाने व्यावसायिकांना नोटीस बजाविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी या मार्गाच्या बांधकामाला निधी मंजूर होईल आणि शहरातून अतिक्रमण काढण्याची वेळ येईल, तेव्हा सर्व दुकानदार स्वत: अतिक्रमण काढतील, असे आश्वासन आमदारांनी या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सध्या अतिक्रमणाच्या मोहिमेला स्थगिती देण्यात आली आहे. (वार्ताहर)