गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शिक्षकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:10 PM2018-04-12T12:10:13+5:302018-04-12T12:10:29+5:30

देसाईगंज तालुक्यातील हनुमंत वॉर्डात राहणाऱ्या राजाराम परशुरामकर (४५) या शिक्षकाचा त्यांच्या घरात शिरून खून करण्याची घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

Teacher's murder at DesaiGanj in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शिक्षकाचा खून

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शिक्षकाचा खून

Next
ठळक मुद्देघरची मंडळी नागपूरला गेली होतीमुलीने आरोपीला ओळखले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील हनुमंत वॉर्डात राहणाऱ्या राजाराम परशुरामकर (४५) या शिक्षकाचा त्यांच्या घरात शिरून खून करण्याची घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे त्यांचे बाहेरगावी गेलेले कुटुंबिय परत आले असताना त्यांनी आरोपीला घरातून पळून जाताना पाहिले.
राजाराम परशुरामकर हे येथील मालेवाडा येथे शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यांचे कुटुंबिय त्या मुलाला घेऊन नागपूरला उपचारासाठी गेले होते. या काळात परशुरामकर हे घरी एकटेच होते. बुधवारी रात्री त्यांचे कुटूंब परत आले असता त्यांना घरातून काही व्यक्ती निघून पळून जाताना दिसल्या. त्यांनी आरडाओरडा केला मात्र ते पळून गेले. घरात जाऊन पाहिले असता परशुरामकर हे रक्ताच्या थारोळ््यात पडलेले दिसून आले. पळून जाणाऱ्यांपैकी एकाला परशुरामकर यांच्या मुलीने ओळखले असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: Teacher's murder at DesaiGanj in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून