शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

शिक्षकांना आता दूरदर्शन प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:09 PM

यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.

ठळक मुद्देपहिली व आठवीचा अभ्यासक्रमएका तासात पाठ्यपुस्तकाचा देणार परिचय

विनोद ताजने /दिगांबर जवादेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/गडचिरोली : गतवर्षी विद्या प्राधिकरणाने मोबाईलवर अ‍ॅपचा वापर करून शिक्षकांना इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता शिक्षकांना वर्गात बसवून प्रशिक्षण देण्याची योजनाच संपुष्टात आली आहे. यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान शिक्षकांना हे प्रशिक्षण त्यांच्या शाळांमध्ये दिले जाणार आहे.राज्य मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ६३ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. या सर्व शाळा प्रशिक्षणाचे केंद्र राहणार आहे. आवश्यकता पडल्यास दोन-तीन शाळांमिळून किंवा केंद्र शाळेत शिक्षकांना एकत्र करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण जीओ टीव्हीच्या मोबाईल अ‍ॅपमधूनही घेता येणार आहे. प्रशिक्षणार्थींची लिंकच्या माध्यमातून उपस्थितीही नोंदविली जाणार आहे.प्रशिक्षणाच्या अखेरीस सर्व शिक्षकांनी गुगलफार्मवर आपले अभिप्राय नोंदवायचे आहे. प्रत्येक विषयाचा प्रशिक्षण कालावधी एक तासाचा ठेवण्यात आला आहे. एका तासात एका विषयाच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून दिला जाणार आहे. विद्या प्राधिकरणने प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक विषयशिक्षकाला प्रशिक्षणाची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र