लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : नगर पंचायतीचे अधिकारी एस. एन. सिलमवार यांच्या नेतृत्वात २२ डिसेंबर रोजी प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून प्लास्टिक वापरणाऱ्या १६ दुकानांवर कारवाई केली.राज्य शासनाने प्लास्टिक, थर्माकोल, डिस्पोजल ग्लास, कॅरीबॅग आदींवर बंदी घातली आहे. मात्र एटापल्ली येथील दुकानदार व इतर व्यावसायिक प्लास्टिक वापर खुलेआम करीत होते. प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करू नये, यासाठी नगर पंचायतीच्या वतीने अनेकदा जनजागृती करण्यात आली. तरीही प्लास्टिकचा वापर सुरूच होता. प्लास्टिक वापराला आळा बसावा, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी मोहीम उघडली. नगर पंचायत कर्मचाºयांच्या मदतीने दुकानांची तपासणी केली असता, १६ दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आली. प्रत्येक दुकानदारांवर ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर प्लास्टिकचा वापर किंवा विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले.नगर पंचायतीने प्लास्टिक विरोधात मोहीम उघडली असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर दुकानदारांनी प्लास्टिकची इतरत्र विल्हेवाट लावली. त्यामुळे ते दुकानदार कारवाईपासून वाचले. अधूनमधून अशा प्रकारची मोहीम राबविली जाईल, अशी माहिती सिलमवार यांनी दिली.
प्लास्टिक आढळलेल्या १६ दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:46 IST
नगर पंचायतीचे अधिकारी एस. एन. सिलमवार यांच्या नेतृत्वात २२ डिसेंबर रोजी प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून प्लास्टिक वापरणाऱ्या १६ दुकानांवर कारवाई केली.
प्लास्टिक आढळलेल्या १६ दुकानांवर कारवाई
ठळक मुद्देएटापल्लीत मोहीम : प्लास्टिक निर्मूलनासाठी नगर पंचायतचा पुढाकार