ही बाब लक्षात घेऊन शिवसेना व युवासेनेकडून रुग्णालयाला ऑक्सिजनच्या २५ सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.
आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात काेराेनाचे जवळपास २५ रुग्ण भरती आहेत. त्यांना ऑक्सिजन कमी पडू नये. तसेच काेराेनाबाधितांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी शिवसेनेचे माजी युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे व नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सागर मने यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया उईके यांची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली व ही बाब माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात किरण पांडव यांच्या पुढाकाराने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १०० सिलिंडर देण्याचे ठरविले. त्यानुसार २५ सिलिंडरची पहिली खेप माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, बांधकाम सभापती सागर मने, माजी शहरप्रमुख भूषण सातव, नगरसेवक माणिक भोयर, शैलेश चिटमलवार, अक्षय चाचरकर, पराग बांते, जयंत दहिकार, डॉ. अनिल उईके यांच्या उपस्थितीत रुग्णालयाला देण्यात आली. या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया उईके व कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
020521\02gad_10_02052021_30.jpg
===Caption===
ऑक्सिजनचे सिलिंडर सुपूर्द करताना सुरेंद्रसिंह चंदेल व पदाधिकारी.