शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

विषय समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच यश

By admin | Updated: December 6, 2015 01:15 IST

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा या चार नगर पंचायतीच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी पार पडली.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा या चार नगर पंचायतीच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत ज्या पक्षाचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत, त्याच पक्षाला सभापती पदाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे. चामोर्शी नगर पंचायतीत बांधकाम सभापती म्हणून उपाध्यक्ष राहूल सुखदेव नैताम यांची वर्णी लागली. तर स्वच्छता व वैद्यक आरोग्य समिती सभापती पदी काँग्रेसचे विजय भास्कर शातलवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुमेध माणिकराव तुरे व महिला बालकल्याण सभापती पदी काँग्रेसच्या सविता सोमदेव पिपरे हे निवडून आले आहेत. स्वच्छता व वैद्यक आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडून विजय शातलवार, भाजपकडून प्रशांत एगलोपवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. शातलवार यांना तीन तर एगलोपवार यांना दोन मते मिळाली. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुमेध तुरे हे अविरोध निवडून आलेत. तर महिला बालकल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसकडून सविता पिपरे, भाजपकडून रोशनी वरघंटे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. पिपरे यांना तीन तर वरघंटे यांना दोन मते मिळाली. सविता पिपरे सभापतिपदी विजयी झाल्या तर याच समितीच्या उपसभापतिपदी काँग्रेसच्या सुनीता धोडरे यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य पदी काँग्रेसकडून वैभव भिवापुरे तर भाजपकडून रामेश्वर सेलुकर यांची नगर पंचायतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीवर सभापती म्हणून नगराध्यक्ष जयश्री पंकज वायलालवार यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून एसडीओ तळपादे, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार यु. जी. वैद्य, नायब तहसीलदार चडगुलवार यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस निरिक्षक अवचार यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कुरखेडा येथे नगर विषय समिती सभापती पदी सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-अपक्ष आघाडीने यश मिळविले. सार्वजनिक बांधकाम सभापती पदी अपक्ष नगरसेवक शाहेदा तबसूम ताहेर मुगल यांची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीवर शिवसेनेचे पुंडलिक देशमुख, स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समितीवर काँग्रेसच्या आशा तुलावी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी उपाध्यक्ष जयश्री धाबेकर यांची निवड करण्यात आली. या समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या चित्रा गजभिये यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य पदी शिवसेना, काँग्रेस व अपक्ष गटातर्फे उस्मान खॉ पठाण व भाजपतर्फे रामहरी उगले यांची निवड करण्यात आली. सिरोंचा येथे भाजप, काँग्रेस व अपक्ष आघाडीने सभापती पदाच्या निवडणुकीत वरचष्मा कायम ठेवला आहे. बांधकाम सभापती पदी भाजपच्या ईश्वरी हनुमय्या बुध्दावार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी भाजपचे विजय तुळशीराम तोकला, आरोग्य समितीच्या सभापती पदी नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष काँग्रेसच्या मुमताज खान हुसेन खान यांची वर्णी लागली आहे. महिला व बालकण्याण सभापती पदी अपक्ष राजेश नरेश तडकलवार यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य पदी भाजपकडून संदीप राचर्लावार तर राकाँकडून नागेश गांगपुरपु यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अशोक कुमरे यांनी काम पाहिले.