शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

विद्यार्थी रात्रीपर्यंत अडकले सिरोंचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:24 IST

सिरोंचा-अहेरी हा रस्ता खराब आहे, परंतु झिंगानूर-आसरअल्ली-अंकिसा आणि टेकडाताला या मार्गावर जाण्यासाठी सिरोंचा मुख्यालयी दोन, तीन बसेस ठेवल्यास   विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे  आहे. सध्या सिरोंचा बस स्थानकाची शोभा तेलंगणाच्या बसेस वाढवत आहेत. महाराष्ट्राचे एसटी महामंडळ योग्य सेवा देऊ शकत नसेल तर तेलंगणाच्या बसेसची सेवा घ्या. त्यांना परवानगी द्या, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी सिरोंचा तालुका मुख्यालयी येणाऱ्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या खटारा बसेस आणि मोजक्या फेऱ्यांमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून बस स्थानकात बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत बस स्थानकात अडकून राहावे लागले.संध्याकाळी पाच वाजतानंतर गडचिरोलीवरून येणारी बस अंकिसा आणि आसरअल्लीपर्यंत जाते. तसेच दुसरी एक बस झिंगानूरला जाते. बहुतांश शाळकरी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बस स्थानकात या बसेसची वाट पाहत असतात. मंगळवारी या बसेसमध्ये बिघाड झाला. एका गाडीचे लाईट खराब होते, तर दुसऱ्या बसची बॅटरी नादुरुस्त असल्यामुळे सर्व विद्यार्थी बस स्थानकावरच अडकून होतेे. सिरोंचा-अहेरी हा रस्ता खराब आहे, परंतु झिंगानूर-आसरअल्ली-अंकिसा आणि टेकडाताला या मार्गावर जाण्यासाठी सिरोंचा मुख्यालयी दोन, तीन बसेस ठेवल्यास   विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे  आहे. सध्या सिरोंचा बस स्थानकाची शोभा तेलंगणाच्या बसेस वाढवत आहेत. महाराष्ट्राचे एसटी महामंडळ योग्य सेवा देऊ शकत नसेल तर तेलंगणाच्या बसेसची सेवा घ्या. त्यांना परवानगी द्या, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे. महामंडळाने याची दखल घेऊन सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.

शिक्षण अधांतरी सोडून देण्याची वेळीग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता यावे, यासाठी जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गत स्कूल बस सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु सिरोंचा तालुक्यात या सेवेचा बोजवारा वाजला आहे. सदर बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडून देण्याची पाळी आली आहे. दररोज अशा खटारा बसेसमुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे १० वाजत आहे. यामुळे पालक वर्ग दररोज चिंतेत पडत आहे. काही पालक तर विद्यार्थ्यांना शाळा सोडून द्या, असे बजावत आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी