शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित  व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाणी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कंटाळा येत असल्याचे विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या आदेशान्वये प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. प्रत्यक्ष वर्ग बंद राहिल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू हाेते. तब्बल दीड वर्षानंतर काेराेनाचा प्रादुर्भाव आटाेक्यात आल्यानंतर आता ४ ऑक्टाेबरपासून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यात येत आहेत. शाळा बंदमुळे शिक्षणात सातत्य न राहिल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित  व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाणी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कंटाळा येत असल्याचे विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले आहे.

एकाच ठिकाणी बसायचे कसेप्रत्यक्ष शाळेत नियमित गेल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी व शिस्त लागते. मात्र दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने सतत घरी राहून विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत. प्रत्यक्ष वर्गात एकाच ठिकाणी तासन् तास बसण्याकरिता विद्यार्थ्यांना कंटाळा येत आहे. 

लिहिण्याचीही अडचणमाेबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने मागील व गतवर्षीच्या सत्रात तसेच आत्तापर्यंत शिक्षण सुरू हाेते. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना जादा लेखन कार्य करावे लागत नव्हते. परिणामी विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली. आता प्रत्यक्ष वर्गात लिहिण्याचा विद्यार्थी कंटाळा करीत आहेत. 

विद्यार्थ्यांची सवय तुटली

दीड वर्षापासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. यादरम्यानच्या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी फारसे प्रयत्न झाले नाही. परिणामी घरी राहून विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली. काही विद्यार्थ्यांचे अक्षर बिघडले आहेत. - विलास मगरे,माध्यमिक शिक्षक.

दीड वर्षांपूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाढे पाठ हाेते. आता त्यांना पाढ्यांचा पूर्णत: विसर पडला आहे. वजाबाकी, बेरीज व इतर आकडेमाेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ लागत आहे. व्यवस्थित वाचताही येत नाही. - हिमांशू गेडाम, प्राथमिक शिक्षक

पाठ दुखतेय

वर्गात बसण्याची सवय तुटल्यामुळे आता पाठीत दुखत आहे. दिवसभर बसण्यासाठी त्रास हाेत आहे. माझे वर्गमित्रसुद्धा खेळण्यावर भर देत आहेत. उशीरा शाळा सुरू झाल्याने अभ्यासक्रमात कपात हाेणार आहे.- विजय करंगामी, विद्यार्थी.

आम्हाला ऑनलाईन शिक्षणाची सवय जडली. आता प्रत्यक्ष वर्गात बसून ज्ञान, आकलन करण्यासाठी थाेडा त्रास हाेत आहे. वर्गात बसून ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत रूळण्याकरिता आणखी काही दिवस लागतील. - श्वेता मेश्राम, विद्यार्थिनी.

आव्हाने काय?प्रत्यक्ष शिक्षणात माेठा खंड पडल्याने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. या सर्व बाबीमुळे शिक्षकांना एकाच गाेष्ट वारंवार पटवून द्यावी लागत आहे. 

यावर उपाय काय?विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शिक्षणात अग्रेसर करण्यासाठी दरराेज लेखन कार्याची सवय लावणे, अधिकाधिक गृहपाठ, आकलन व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना शाळेत नियमित अध्ययनासाठी मार्गदर्शन करावे लागणार आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी