शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धूळवडीला गावी जाणे बेतले विद्यार्थ्याच्या जीवावर... नक्षल्यांनी गोळी झाडून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:19 IST

भामरागड हादरले: महासंचालकांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच घटना

रमेश मारगोनवार

भामरागड (जि.गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यात पुलाच्या कामावरील तीन वाहने जाळल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी धूळवडीला गावी गेलेल्या एका विद्यार्थ्याला गोळीचा निशाणा बनवले. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने भामरागड हादरले आहे.

साईनाथ चौतू नरोटी (२६,रा.मरदूर ता.भामरागड) असे मयताचे नाव आहे. तो गडचिरोली येथे पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. होळी व धूलिवंदन सणासाठी गावी गेला होता. ९ मार्च रोजी तो पुन्हा गडचिरोली येथे परतणार होता, परंतु त्यापूर्वीच  नक्षल्यांनी त्याला लक्ष्य केले. दुपारी २ वाजता कामानिमित्त तो आई- वडिलांसह शेतात गेला होता. दुपारी ४ वाजता शेतातून परतताना मरदूर- कत्रनगट रस्त्यावर नक्षल्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. 

नारगुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. १० मार्च रोजी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.  दरम्यान, हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, तो पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने किंवा पोलिस भरतीत सहभागी झाल्याच्या रागातून त्यास संपविले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर अधीक्षक अनुज तारे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

महासंचालकांच्या दौऱ्यावर सावट

मेळाव्यानिमित्त १० मार्च रोजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील हे गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे येत आहेत. नक्षल्यांनी पूर्वसंध्येला विद्यार्थ्याची हत्या केल्याने या दौऱ्यावर या घटनेचे सावट निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीStudentविद्यार्थी