शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

दक्षिण भागाला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:19 IST

चामोर्शी, मुलचेरा, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री वादळाने कहर माजविला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर काही मार्गावर झाडे कोसळल्याने रात्रभर वाहतूक ठप्प होती. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला.

ठळक मुद्देघरांवरचे छत उडाले : वीज कोसळून तीन जनावरे ठार, अनेक गावांचा रात्रभर वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी, मुलचेरा, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री वादळाने कहर माजविला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर काही मार्गावर झाडे कोसळल्याने रात्रभर वाहतूक ठप्प होती. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.मुलचेरा तालुक्यातील लगाम परिसरातील लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, गिताली आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. आष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या लगाम येथील मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. लहान वाहने व बसेस गावातील अंतर्गत मार्गाने काढल्या जात होत्या. मात्र जड वाहने गावातून नेणे शक्य नसल्याने या वाहनांची धुन्नूर फाट्यापर्यंत पाच किमीपर्यंतची रांग लागली होती. वादळी पावसाच्या तडाख्याने झाडे वीज तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. विजेच्या तारा लोंबकळत होत्या. लगाम येथील कवडू श्रीकोंडावार यांच्या घरावरील टिन व कवेलु उडून गेल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले. ते झोपेत असताना कवेलु पडल्याने किरकोळ नुकसान झाले. दिलीप कोसरे यांच्या शौचालयाच्या भिंतीवर झाड कोसळल्याने भिंत कोसळली.देशबंधूग्राममधील जवळपास २५ ते ३० घरांचे छप्पर उडून गेले. वादळामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रफुल्ल बाच्छाड, रंजित बाच्छाड, सुभाष सरकार, सुमारेश सरकार, निमाई पांडे यांच्यासह घरांची पडझड झाली. वीज तारा तुटल्याने या गावाचा वीज पुरवठा खंडीत झाला. देशबंधूग्राम गावातील रस्त्याच्या बाजुला एक म्हैस व गाय मृतावस्थेत आढळली. त्यांच्यावर वीज पडल्याची शंका उपस्थित केली जात आहे.राजाराम परिसरात गुरूवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास वादळ आले. राजाराम परिसरातील खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी आदी गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गोलाकर्जी येथील बुच्चा गंगराम आत्राम यांच्या बैलावर वीज पडल्याने बैल ठार झाला. पं.स. सदस्यांनी गोलाकर्जी येथे जाऊन पाहणी केली. तलाठी ई. एस. चांदेकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ठार झालेल्या बैलाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य भास्कर तलांडे, तलाठी ई. एस. चांदेकर, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आत्राम, कोतवाल महादेव आत्राम, राकेश कंबगोणीवार, बिच्चु मडावी, भिमा सडमेक, मुसली सडमेक, शंकर सिडाम, सिताराम सिडाम, अशोक आत्राम, इंदरशहा सडमेक आदी उपस्थित होते.आष्टी येथील आलापल्ली मार्गावरील ग्रामीण रूग्णालयाजवळ असलेले झाड विद्युत तारांवर कोसळले. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. सुमारे पाच तास वीज पुरवठा खंडीत होता. शुक्रवारी सकाळपर्यंत पडलेले झाड रस्त्यावरच होते. त्यामुळे रस्त्याच्या बाजुने वाहने न्यावी लागत होती.अहेरी तालुक्यातील आलापल्ली, अहेरी, नागेपल्ली, खमनचेरू परिसराला वादळी वाºयाची व पावसाची झळ सोसावी लागली. आलापल्ली वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.भामरागडमध्येही वादळी पाऊस झाला. गुरूवारी रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता. शुक्रवारी सकाळी वीज आली. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे नागरिक कमालीचे कंटाळले आहेत.आष्टी-आलापल्ली महामार्गावरील १३ तास वाहतूक ठप्पआष्टी-आलापल्ली मार्गावरील लगाम गावाजवळ रस्त्यावरच झाड कोसळले. लहान वाहने गावातील अंतर्गत मार्गाने नेऊन अडथळा पार केला जात असला तरी जड वाहने मात्र गावातून नेणे शक्य नसल्याने झाड तोडण्याची प्रतिक्षा करावी लागली. रात्री ११ वाजताच्या सुमारास झाड कोसळले. गावातील वीज पुरवठाही खंडीत झाला. त्यामुळे रात्रीच्या सुमारास झाड तोडणे शक्य नव्हते. सकाळी गावकऱ्यांनी झाड तोडून रस्ता मोकळा केला. तोपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती. लगामचे सरपंच मनिष मारटकर, चुटुगुंटाचे सरपंच सुधाकर नैताम यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना घेऊन रस्त्यावरचे झाड मोकळे केले. अहेरीचे पोलीस निरिक्षक सतिश होडगर, वन परिक्षेत्राधिकारी मनोज चव्हाण, ट्राफीक पोलीस बेगलाजी दुर्गे यांनी पहाटेपासून रहदारी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. लगाम येथील छोटू श्रीकोंडावार, दीपक आत्राम यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले.

टॅग्स :weatherहवामान