लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्र असलेल्या चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील आस्था जिनिंग व प्रेसींग फॅक्टरी १ जूनपासून बंद होणार आहे. विक्रीअभावी अद्यापही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस पडून आहे. परिणामी शेतकरी चिंतेत सापडला आहे. येथील खरेदी केंद्र बंद होणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर कापूस खरेदीचे आव्हान उभे राहणार आहे.सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाऱ्या नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी व कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यापूर्वी उत्पादक इतर जिल्ह्यात कापूस नेऊन त्याची विक्री करीत होते. परंतु अनखोडा येथील कापूस खरेदी केंद्रामुळे शेतकºयांना फेडरेशनच्या कापूस खरेदीचा लाभ मिळत होता.१७ डिसेंबर २०१९ पासून अनखोडा येथील जिनिंग फॅक्ट्रीमध्ये सुरू असलेली फेडरेशनची कापूस खरेदी कोरोच्या प्रादुर्भावामुळे बंद होती. त्यानंतर गडचिरोली जिल्हा कोरोनाबाबत ग्रीन झोनमध्ये असल्याने २२ एप्रिलपासून अल्प प्रमाणात अनखोडा येथे कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी व मंगळवारी केवळ २० गाड्या इतकाच कापूस खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढे तीन दिवस कापूस खरेदी केली जात आहे.सदर कापूस खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना आपला कापूस पर जिल्ह्यात व राज्यात न्यावे लागणार आहे.संचालकांनी मागितली फॅक्टरी बंदची परवानगीकोविड-१९ चा प्रादुर्भाव व जिनिंग फॅक्टरीमध्ये कामावर असलेले प्रेस ऑपरेटर, जिनिंग फिडर आदी तंत्रज्ञ व इतर कामगार गावाकडे जाण्याची संचालकांना परवानगी मागत आहेत. त्यामुळे जिनिंग फॅक्टरी चालविण्यास अडचण येत आहे. याशिवाय जून महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने कापसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे पर्यंत कापूस खरेदी प्रक्रिया सुरू राहिल एवढेचा कापूस खरेदी करावा. पुढील महिन्यात शेतीच्या कामाला सुरूवात होणार असल्याने स्थानिक मजूर उपलब्ध होऊ शकणार नाही. ही सर्व कारणे बघता अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी बंद करण्याची परवानगी संचालकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे.
जूनपासून कापूस खरेदी बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST
सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाºया नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी व कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
जूनपासून कापूस खरेदी बंद?
ठळक मुद्देहजारो क्विंटल कापूस पडून : जिल्हा प्रशासनासमोर कापूस खरेदीचे आव्हान