शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी येथे बँक शाखा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी ...

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय, येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.

अनेक वाॅर्डांतील नाल्यांची दुरवस्था

आरमाेरी : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाले खाली गेले आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नाल्यात पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी

धानोरा : तालुक्यातील मोहलीत बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु, त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्मशानभूमींची दुरवस्था वाढली

काेरची : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.

मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)- नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.

पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलांचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहे. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.

नागमाता मंदिराजवळ गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.