शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेची डोळ्यावर पट्टी : मेडिगड्डाच्या पाण्याखाली बुडणाºया पिकांमुळे शेतकरी हवालदिल

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्य सुजलाम-सुफलाम होत असले तरी या बॅरेजच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. हजारो हेक्टरमधील उभे पीक पाण्याखाली जात असताना तालुका किंवा जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी, तोंडावर बोट ठेवून असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.अवघ्या तीन वर्षात तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा या भव्य प्रकल्पामुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेतीला सिंचन होण्यासोबतच या प्रकल्पाचे पाणी त्या राज्यातील कोट्यवधी लोकांची तहान भागवणार आहे. परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मरणदायी ठरण्याची शक्यता आता बळावली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पाचे पाणी अडविल्यानंतर प्रकल्पाचे पाणी बुडित क्षेत्रालगतच्या शेतांमधील पिकांमध्ये पसरत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असताना प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.सिरोंचा तालुक्यातील वडधम (पोचमपल्ली) गावाजवळील मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने प्राणहिता नदीतील वर्षभर वाहणारे प्रकल्पाचे पाणी वेगाने मागे जाऊन महाराष्ट्राच्या बाजूने गोदावरी व प्राणहिता नदीच्या खोऱ्यातील मूग, ज्वारी, चना, भूईमूग यासारख्या रबी पिकांना फटका बसत आहे.तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.पाण्याखाली गेलेल्या शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.नुकसानभरपाई कोण देणार?हाताशी आलेले पीक आता वाया जाणार या चिंतेने ग्रस्त शेतकºयांना आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा प्रश्न पडला आहे. पीकांची नुकसानभरपाई महाराष्ट्र सरकार देणार, की तेलंगणा सरकार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने आापल्या शेतकºयांच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता तेलंगणा सरकारला पूर्ण मदत केली. त्यामुळे आता राज्य सरकारनेच शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.अधिकारी बेजबाबदारमेडिगड्डाच्या बॅक वॉटरमुळे पोचमपल्ली, पेंटीपाका, आरडा, सिरोंचा, मेडाराम, कारासपल्ली, रंगाय्यपली, कोठा, पोचमपल्ली आदी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यात तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आतापर्यंत तालुका प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने तिकडे फिरकूनही पाहिले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती