शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:30 IST

मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी त्रस्त : शालेय बस वेळेवर सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.मानव विकास मिशनच्या बसगाड्या शाळेच्या वेळेत सोडण्यात याव्या. तसेच शाळेजवळ बसथांबा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. या बसगाड्यांच्या वाहतुकीचा खर्च सरकार देत आहे. सदर बसगाड्यांमध्ये केवळ विद्यार्थ्यांनीच प्रवास करावा, असे असताना एसटी महामंडळाने मनमानी कारभार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्यातून प्रवाशी खचाखच भरून नेले जातात. याचा विद्यार्थ्यांना बऱ्याचदा फटका बसतो.काही बसथांब्यावर विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असताना बसगाडी थांबविली जात नाही. परिणामी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही. एकूणच महामंडळाकडून नियमाला बगल दिली जात आहे. धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रवेश असलेले १६० विद्यार्थी बाहेर गावावरून ये-जा करीत असतात.सदर शाळेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी आहे. मात्र धानोरा तालुक्यात अनेक मार्गावर या वेळेत बस फेरी नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचत नाही. सायंकाळी शाळा सुटण्याअगोदर बसेस निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धानोराच्या बसस्थानकावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी त्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो. अशा वेळी बाहेरगावावरून ये-जा करणाºया मुलींना छेडछाड व इतर प्रकारचा धोका होण्याची शक्यता आहे.बसथांबा व बसफेरी शाळेच्या वेळेत सोडण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याध्यापकांच्या वतीने ६ जुलै रोजी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापकांना देण्यात आले होते. त्यावेळी व्यवस्थापकाने सकारात्मक प्रतिसादही दर्शविला होता. मात्र विद्यार्थी व पालकांच्या मागणी पूर्ण करण्यात आली नाही.असे हवे वेळापत्रकधानोरावरून गडचिरोलीकडे जाणारी सायंकाळी ४.४५ वाजताची बस ५.१५ वाजता सोडण्यात यावी, धानोरा-मुरूमगाव-कोटगूल ही बसफेरी ४.३० वाजता ऐवजी सायंकाळी ५.१५ वाजता धानोरा येथून सोडण्यात यावी, अशा पध्दतीचे वेळापत्रक महामंडळाच्या गडचिरोली आगाराने केल्यास विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होईल. मुरूमगाववरून येणारी बस धानोरा येथे शाळेजवळ थांबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांची आहे.

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी