लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी/आलापल्ली : लोकमत समूहातर्फे अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी झालेल्या रक्तदान शिबिरात २६ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम तर अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एल.हकीम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडंट राजेश्वर बाळापूरकर, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सीआरपीएफ ३७ बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद सातोरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, मुख्याध्यापक गजानन लोणबले, पं.स.मुलचेराचे माजी सभापती प्रा.विठ्ठल निकुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरूवात करण्यात आली. आ.धर्मरावबाबा आत्राम व कमांडंट बाळापूरकर यांनी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत रक्तदानाचे महत्व पटवून दिले. तसेच लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक उपक्रमात लाेकमत नेहमीच अग्रेसर राहात असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे आलापल्ली प्रतिनिधी प्रशांत ठेपाले यांनी, सूत्रसंचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका वैशाली देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन लोकमतचे अहेरी प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनी केले. या शिबिरासाठी प्रशांत ठेपाले, अहेरीचे प्रतिनिधी विवेक बेझलवार, प्रतीक मुधोळकर, सखी मंच संयोजिका वैशाली देशपांडे, वेलकम फाऊंडेशन व कर्तव्य फाउंडेशन आलापल्ली, हेल्पिंग हँड्स संस्था अहेरी, पोलीस विभाग, वनविभाग, सीआरपीएफ ९ व ३७ बटालियन आदींनी सहकार्य केले. शिबिरासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहायक निखिल कोंडापर्ती, शिरीन कुरेशी, शरद बांबोळे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
उपनिरीक्षक शेख यांचे २५ वे रक्तदानसीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक शेख सलीमुद्दीन यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी या शिबिरात आपले २५ वे रक्तदान पूर्ण केले. सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडन्ट राजेश्वर बाळापूरकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि मूलचेरा तालुक्यातील नागरिकांनीही या शिबिरात रक्तदान करून आपले योगदान दिले. अनेक इच्छुकांना वैद्यकीय कारणास्तव रक्तदानापासून वंचित राहावे लागले.
या रक्तदात्यांनी घेतला पुढाकार
या शिबिरात एकूण २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात सीआरपीएफ ९ बटालियनचे जवान नितीन चौहान, शेख सलीमुद्दीन, अनिश जी, दीपक दास, उगले सितारु, नीरज कुमार, फकीर चांद, सुजित दास, सुधन घोष, आलापल्लीचे नितीन खरवडे, विप्लव भौमिक, चेतन कत्रोजवार, धर्मराव कृषी विद्यालयाचे शिक्षक प्रवीण बुराण, हर्षल पोलोजवार, मुकेश बिटपल्लीवार, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, मुलचेरा पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल निखुले, निलेश लिंगे, प्रफुल कोंडगुर्ले, रुपेश सूनतकर, राजेश वर्मा, सुरज आत्राम, नरेश पडालू, अमोल वेळदा, यश डब्बा, विजय कोरा आदींचा समावेश होता.
अन् ठाणेदार प्रवीण डांगे रक्तदानासाठी सरसावलेविशेष म्हणजे अहेरी पोलीस निरीक्षक (ठाणेदार) प्रवीण डांगे या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्यक्ष रक्तदानाची तयारी सुरू होताच मीसुद्धा रक्तदान करणार, असे सांगत रक्तदानासाठी पहिला नंबर लावला. लोकमतने सुरू केलेल्या या रक्तदान चळवळीने आपल्याला रक्तदानासाठी प्रेरणा मिळाली असून या शिबिरांमध्ये प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.