लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी ते गोगाव बसस्थानकादरम्यान भरधाव चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिली. या धडकेनंतर हे वाहन रस्त्याच्या खाली शेतात उलटले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.सदर घटना बुधवार १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता गोगाव बसस्थानकाजवळ घडली. या अपघातात भीमराव भानू कमरेटी (३५) रा.ताटीगुडम ता.अहेरी हे गंभीर जखमी आहेत. तर अभिजीत बाबुराव मडावी (२५) रा.विवेकानंदनगर, गडचिरोली यांनाही जबर मार लागला आहे. या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.एमएच १४ सीएक्स ६००३ क्रमांकाची झायलो गाडी गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात होती. दरम्यान सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठाणी नदीजवळ या वाहनाची झाडाला भीषण धडक बसली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या पलिकडे शेतात जाऊन उलटले. अपघातानंतर वाहनातील दोघेही जखमी बेशुद्ध होऊन पडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.
भरधाव वाहनाची झाडाला धडक; दोन युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST
एमएच १४ सीएक्स ६००३ क्रमांकाची झायलो गाडी गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात होती. दरम्यान सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठाणी नदीजवळ या वाहनाची झाडाला भीषण धडक बसली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या पलिकडे शेतात जाऊन उलटले. अपघातानंतर वाहनातील दोघेही जखमी बेशुद्ध होऊन पडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.
भरधाव वाहनाची झाडाला धडक; दोन युवक गंभीर
ठळक मुद्देकठाणी नदीजवळ अपघात : क्षतीग्रस्त कार शेतात उलटली