शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी ट्रकवर धडकली, तीन तरुण जागीच ठार

By संजय तिपाले | Updated: January 10, 2024 13:32 IST

गडचिरोली शहराजवळील घटना : जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

संजय तिपाले, गडचिरोली: भरधाव दुचाकी समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकवर आदळल्याने तीन तरुण जागीच गतप्राण झाले. ही घटना ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूर रोडवरील मुरखळा गावानजीक घडली. मृत तरुणांचे वय जेमतेम २० ते २३ इतके असून ते एकमेकांच्या नात्यातील आहेत.  

पोलिसांच्या माहितीनुसार,अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०, सर्व रा. गोविंदगाव ता.अहेरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजे सुमारास तिघे नव्या कोऱ्या  दुचाकीवरून  गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळच्या वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला.  घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते. १० जानेवारी रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करुन तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. 

टॅग्स :Accidentअपघात