लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावर लेंढारी नाल्यावरील मोठ्या पूलावरून कार खाली लगत असलेल्या जुन्या निर्लेखित करण्यात आलेल्या लहान पूलावर कोसळली. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. कारचा समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. ही घटना लेंढारी नाल्यावर मंगळवारला घडली.कुरखेडा येथील व्यावसायिक जयगोपाल पालीवाल हे मंगळवारला सकाळी एकटेच कार (एमएच ३१ डी. सी. २३४७) या वाहनाने कुरखेडावरून कोरचीकडे जात होते. दरम्यान, ९.३० वाजेचा सुमारास लेंढारी येथील मोठ्या पुलावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार हवेत सूर मारत १० ते १५ मीटर अंतर असलेल्या खाली जुन्या लहान पुलावर कोसळली. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कारचालक जयगोपाल पालीवाल याना किरकोळ जखम झाली. अपघाताची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.
भरधाव कार मोठ्या पुलावरून जुन्या लहान पुलावर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST
कुरखेडा येथील व्यावसायिक जयगोपाल पालीवाल हे मंगळवारला सकाळी एकटेच कार (एमएच ३१ डी. सी. २३४७) या वाहनाने कुरखेडावरून कोरचीकडे जात होते. दरम्यान, ९.३० वाजेचा सुमारास लेंढारी येथील मोठ्या पुलावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार हवेत सूर मारत १० ते १५ मीटर अंतर असलेल्या खाली जुन्या लहान पुलावर कोसळली.
भरधाव कार मोठ्या पुलावरून जुन्या लहान पुलावर कोसळली
ठळक मुद्देलेंढारी नाल्यावरील घटना, सुदैवाने जीवितहानी नाही