शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

कृषिपंप जोडणीसाठी विशेष मोहीम

By admin | Updated: April 1, 2015 01:37 IST

जे शेतकरी वीज जोडणी करण्यास इच्छूक आहेत, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी, ...

गडचिरोली : जे शेतकरी वीज जोडणी करण्यास इच्छूक आहेत, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी, यासाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम उघडण्यात आली असून याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना २० एप्रिलपर्यंत संबंधित वीज विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. शासनाकडून अनुदानावर विहीर उपलब्ध झाल्यानंतर विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून पीक घेण्याच्या उद्देशाने शेतकरी वर्ग वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणी करण्यासाठी अर्ज करतात. त्यासाठी आवश्यक असलेले डिमांडही भरले जाते. मात्र वर्षाचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळत नाही. हा नेहमीचाच शेतकऱ्यांना येणारा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली होती. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या आहेत. लाखो रूपये खर्चूनही वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. शेतकऱ्यांची या जाचातून सुटका करण्याच्या उद्देशाने महावितरणने कृषिपंप वीज जोडणीसाठी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह नवीन वीज जोडणीचा ए-१ हा अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्ज दाखल होताच महावितरणचे कर्मचारी संबंधित शेतकऱ्याला तत्काळ वीज जोडणी करून देणार आहेत. यामुळे वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीचे खेटे घालण्याचा त्रास कमी होणार आहे. कृषिपंपासाठी अर्ज केल्यानंतर शेतकरी तत्काळ खासगी दुकानातून कृषिपंप खरेदी केले आहे. मात्र वर्षाचा कालावधी उलटूनही जोडणी न झाल्याने सदर कृषिपंपाचे कर्ज शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून आहे. दुसरीकडे खर्च होऊनही सिंचनाअभावी उत्पन्नात वाढ झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महावितरणच्या या मोहिमेमुळे तत्काळ वीज जोडणी मिळून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)