शिवराजपुरात स्वयंचलित यंत्राणे केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:24 AM2021-06-21T04:24:11+5:302021-06-21T04:24:11+5:30

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. ...

Sowing of grain by automatic machinery in Shivrajpur | शिवराजपुरात स्वयंचलित यंत्राणे केली धानाची पेरणी

शिवराजपुरात स्वयंचलित यंत्राणे केली धानाची पेरणी

googlenewsNext

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. यातील ६० टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भात रोवणीची कामे पाऊस आल्यानंतर एकच वेळी सुरुवात होतात. अशावेळी रोवणीच्या कामासाठी मजुरांची टंचाई निर्माण हाेते. सर्वांची रोवणी एकाच वेळेस होणे अशक्यप्राय बाब आहे. पावसातील खंड व मजुरांची टंचाई यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे ३० ते ५० दिवसांपर्यंत रोपवाटिकेतच असतात. वास्तविक अधिक उत्पादन वाढीसाठी २० ते २५ दिवसांचे रोपे रोवणे आवश्यक असते. यामध्ये जसजसा कालावधी वाढत जाईल. तसतसा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असते.

नियंत्रित अंतरावर भात लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने भाताची पेरणी करण्याचा सल्ला त्यांना कृषी सहायक योगेश बोरकर यांनी दिला. केवळ आठ किलो बियाणांत आपले एक एकर क्षेत्र त्यांनी पेरणी करून दाखविले. सोबतच खात सुद्धा यंत्राद्वारे दिले. त्यामुळे प्रभावित होऊन शिवराजपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. पेर पद्धतीने पेरणी केलेली जमीन ही ८-१० दिवस पाण्याचा ताण सहज सहन करू शकते. त्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या पद्धतीमधील तांत्रिक बाबी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम व मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांनी समजवून दिल्या. यावेळी कृषी सहायक योगेश बोरकर, सुधाकर कोहळे उपस्थित हाेते.

===Photopath===

200621\img-20210620-wa0001.jpg

===Caption===

शिवराजपुर येथून कृषी संजीवनी मोहिमेला सुरवात

Web Title: Sowing of grain by automatic machinery in Shivrajpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.