शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
5
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
7
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
8
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
9
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
10
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
11
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
12
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
13
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
15
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
16
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
17
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
18
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
19
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
20
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न मिळाल्याने गेला बाळंतीणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:10 IST

तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमांडरा येथील महिला : रुग्णवाहिका सेवेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.सुशीला ही अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथील मूळ रहिवासी होती. तिचा विवाह याच तालुक्यातील मांडरा येथील राकेश सिडामसोबत झाला होता. बाळंतपणासाठी ती आपल्या मूळ गावी व्यंकटापूर येथे आली होती. २१ एप्रिल रोजी तिचे घरीच बाळंतपण झाले. नंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला २५ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली.दरम्यान सुशिला सासरी पोहोचल्यानंतर तिच्या शरीरातील रक्ताच्या प्रमाणात कमतरता येऊ लागली. तिचे हिमोग्लोबिन ४ ग्रॅमवर आले. तब्येत खालावत असल्याची माहिती सुशीलाच्या सासरच्या मंडळीने गावातील आशा वर्करकडे दिली, मात्र तिच्याकडे पुरेशे साहित्य नसल्याचे तिने सांगितले. सुशीलाचा पती यावेळी छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी गेला होता. तब्येत अत्यंत खालावत असल्याची माहिती सुशीलाचे भाऊजी लबंना तलांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मांडरा गाव गाठले.सुशीलाला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिकेची गरज होती. पण अनेक प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर एका खाजगी वाहनातून सोमवार दि.१४ मे रोजी सुशीलाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिला रक्त चढविण्यात आले. अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ.अमोल पेशट्टीवार तथा नर्सेस यांनी सुशीलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण प्रकृती जास्तच खालवल्याने तिला गडचिरोली जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. मात्र वाटेतच सुशीलाचा मृत्यू झाला.वेळेवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुशीलाची तपासणी केली असती तर तिचा जीव वाचला असता. दोन दिवसांपूर्वीच रुग्णवाहिका न मिळाल्याने कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बाळांतीण महिलेचा मृत्यू झाला.कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, पुजाऱ्याकडे उपचारयादरम्यान सुशीला व तिच्या नवजात मुलीची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र मांडरा येथील आरोग्य सेविका मागील दिड वर्षांपासून सतत गैरहजर आहे. तसेच एनआरएचएमअंतर्गत येत असलेली एएनएम संपावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कोणत्याच कर्मचाराऱ्याने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुशीला व तिच्या नवजात मुलीची तपासणी केली नाही. त्यामुळे गावातील पुजाऱ्याकडे तिचे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू