प्रहारच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:59+5:302021-07-07T04:45:59+5:30

सामाजिक बांधिलकी जोपासत कुठल्याही प्रकारचे बॅनर न लावता त्या खर्चातून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे फळवाटप करण्यात आले. तसेच आरमोरी-ब्रह्मपुरी ...

Social activities on behalf of Prahar | प्रहारच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम

प्रहारच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम

सामाजिक बांधिलकी जोपासत कुठल्याही प्रकारचे बॅनर न लावता त्या खर्चातून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे फळवाटप करण्यात आले. तसेच आरमोरी-ब्रह्मपुरी रोड बर्डी येथे वृक्षारोपण करण्यात आले आणि एका गरीब मुलीचा वाढदिवस साजरा करून तिला नोटबुक व पेन देण्यात आला. एका म्हाताऱ्या आजीबाईला पायाच्या त्रासामुळे खाली बसण्यासाठी त्रास होत होता, त्या आजीबाईला बसण्यासाठी एक खुर्ची घेऊन देण्यात आली. तसेच पावसाची अडचण लक्षात घेता, एका गरजू महिलेच्या घरावर शेड उभारण्यासाठी टिनाचे पत्रे घेऊन देण्यात आले.

याप्रसंगी आरमोरी तालुका प्रहारचे अध्यक्ष निखिल धार्मिक, प्रहारचे पदाधिकारी विकास धंदरे, अक्षय बोरकर, अनंत भोयर, रिंकू झरकर, विनोद निमजे, प्रणित सेलोकर, गुरु वाडगुरे, विकी उंदीरवाडे, अविनाश सुके, महेश ठाकरे, विवेक ठाकरे, शुभांगी गराडे, मंगला मोटघरे, अलका भोयर, विजेता खोब्रागडे, रागिना कांबळे, गीता शेडमाके, भाऊराव दिवटे, हरिदास गराडे, राकेश बागडे, युवराज मेश्राम, गुणवंता रामटेके, वर्षा खेडकर आदी उपस्थित होते.

060721\img-20210706-wa0051.jpg

गरीब मुलीचा वाढदिवस साजरा करून शिक्षनापयोगी साहित्य देताना प्रहारचे निखिल धार्मिक

Web Title: Social activities on behalf of Prahar