शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

चेहऱ्यावर हास्य, मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन... नक्षलवाद चळवळीच्या शेवटाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल

By संजय तिपाले | Updated: October 15, 2025 13:58 IST

शस्त्र ठेवले, संविधान घेतले : आता शहरी नक्षलवादाविरुध्द लढा तीव्र करणार : देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : दंडकारण्यातील माओवादी चळवळीचा वरिष्ठ नेता व पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ जणांनी १४ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या सर्वांनी आत्मसमर्पण केले.

माओवाद्यांच्या गणवेशात भूपतीने आपल्याकडील शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपविले, मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती संविधान देऊन त्याचे स्वागत केले. तीन दशके माओवाद्यांच्या अगणित हिंसक कारवायांचा रणनीतीकार राहिलेल्या भूपतीच्या चेहऱ्यावर आत्मसमर्पणावेळी हास्य, समाधान होते, हस्तांदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्याशी संवाद साधला.    माओवादी चळवळीतील अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणून याकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पोलिस मुख्यालयावरील शहीद पांडू आलाम सभागृहात मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात भूपतीसह २० माओवाद्यांचे स्वागत केले. अलीकडेच प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (माओवादी) संघटनेची धुरा जहाल नेता थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्याकडे सोपविली. या पदासाठी भूपतीही दावेदार मानला जात होता. देवजीने सूत्रे स्वीकारल्यानंतर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते भूपतीने युध्दबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, यावरुन माओवादी चळवळीतील केंद्रीय नेतृत्वाशी त्याचे मतभेद झाले होते. सशस्त्र संघर्ष संपवून संवादाचा मार्ग स्वीकारा, अशी भूपतीची भूमिका संघटनेला मान्य नव्हती. ते हिंसक लढाईवर ठाम होते. त्यामुळे अखेर भूपतीने माओवाद्यांचा ६० जणांचा गट घेऊन आत्मसमर्पण केले. यावेळी संविधान देऊन मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांचे स्वागत केले.    

आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस महानिरीक्षक (अभियान) संदीप पाटील, विशेष अभियानचे अपर पोलिस महासंचालक छेरींग दोरजे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प. सीईओ सुहास गाडे , पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

'तारक्का'ने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

भूपतीची पत्नी व पॉलिट ब्युरो सदस्य विमला सिडाम उर्फ तारक्काने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. भूपतीचा भाऊ किशनजी याचा २०११ मध्ये पश्चिम बंगालमधील चकमकीत खात्मा झाला होता, त्याची पत्नी पाेथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने १३ सप्टेंबर रोजी तेलंगणात आत्मसमर्पण केले होते. भूपतीच्या आत्मसमर्पणाने पत्नी तारक्काच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव होते. आयुष्याच्या सायंकाळी आता ते एकत्रितपणे सामान्यांप्रमाणे आयुष्य जगणार आहेत. तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही तारक्का व भूपती यांचा एकत्रित सत्कार केला.

यांनी केले आत्मसमर्पण 

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये जहाल नेता भूपतीसह माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० मधील दहा केंद्रीय समिती सदस्य, उपकमांडर, विभागीय समिती सदस्य व सदस्यांचा समावेश आहे. सावी तुमरेटी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, कोसा कोवासे, प्रियंका तेलामी, रोशनी कुडचामी, मधु टेकाम, सुरेश तलांडे, निर्मला तारामी, सुनल कुंजाम, सागर सिडाम, मैनू   गावडे, शबीर उर्फ अर्जुन, निखील लेखामी, कलमसहाय वेलादी, स्वाती उर्फ सरोज उर्फ लता, विवेक उर्फ भास्कर यांच्यास ६१ जणांनी गणवेशात स्वयंचलित शस्त्रासह आत्मसमर्पण केले. १ कोटींचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाला जाहीर केले. आत्मसमर्पित माओवाद्यांना पुनर्वसन योजनेद्वारे बक्षीस तसे विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 

छत्तीसगड, तेलंगणातही आत्मसमर्पण होईल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भूपतीसह ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण हा या हिंसक चळवळीच्या शेवटाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतर छत्तीसगड व तेलंगणातही अनेक महत्त्वाचे कॅडर आत्मसमर्पण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत माओवादमुक्तीचा संकल्प केला आहे. त्याआधीच महाराष्ट्रातून माओवाद संपेल. मात्र, यानंतरही सुरक्षा दलाला सतर्क रहावे लागेल. आता शहरी नक्षलवादाचा धोका वाढत आहे. लढाई शहरी नक्षलवादविरुध्द संविधान अशी आहे. यात संविधानच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Top Maoist Leader Surrenders, Signals End of Naxalism in Maharashtra

Web Summary : Senior Maoist leader Bhupati and 60 others surrendered to Maharashtra police. Bhupati handed over his weapon to the Chief Minister, who welcomed him with the Constitution. This significant development signals a major step towards ending Naxalism in the state, with more surrenders expected in neighboring states.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTelanganaतेलंगणाChhattisgarhछत्तीसगड