शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

कौशीकांचा झाला गेम

By admin | Updated: March 22, 2017 01:53 IST

जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अपक्ष सदस्य वर्षा दिलीप कौशीक यांचा या संपूर्ण राजकीय घडामोडीत

काँग्रेस, भाजप दोघांकडेही मागितले होते अध्यक्षपद गडचिरोली : जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अपक्ष सदस्य वर्षा दिलीप कौशीक यांचा या संपूर्ण राजकीय घडामोडीत गेम झाल्याची चर्चा काँग्रेस व भाजप दोघांच्याही गोटात होती. वर्षा कौशीक यांचे यजमान दिलीप कौशीक सुरूवातीपासून भाजपच्या संपर्कात होते व त्याचवेळी ते काँग्रेसच्याही संपर्कात होते. आपण अपक्ष असल्याने आपण कुठेही जाण्यास मोकळे आहोत, असे ते जाहीररित्याही बोलत होते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामांना शब्द दिल्यानंतर भाजपने सन्मानजनक वाटा देण्याचे त्यांना कबूल केले होते. मात्र सोमवारी कौशीक यांनी भाजपकडे अध्यक्ष पदाची मागणी रात्री उशीरा केली. त्याचबरोबर काँग्रेसकडेही अध्यक्ष पदाची मागणी केली. कौशीक यांना अध्यक्ष पद देण्यास काँग्रेस तयार झाली होती, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना मंगळवारी दिली. भाजपला कौशीक आपल्यासोबत राहणार नाही, याची चाहूल सोमवारी सायंकाळीच लागली होती. त्यांच्या बोलण्यानंतर भाजपचे जिल्ह्यातील आमदार, खासदार त्यांचा तोरा समजून गेले होते त्यामुळे भाजपने कौशीक यांना धडा शिकविण्यासाठी आविसंला सोबत घेत सत्तेचे समीकरण जुळवून आणले. त्यामुळे कौशीकांची गरजच उरली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांना उपाध्यक्ष पद देण्याचे निश्चित झाल्यानंतर कौशीकांचा अध्यक्ष पदांवरचा दावा झाला. भाजप, काँग्रेस दोन्हीकडे ते याच पदावर दावा ठेवून होते. आपल्या भरवशावरच दोन्ही पक्षाची सत्ता बसू शकते, असा त्यांचा तोरा होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रकार ओळखत आविसंला जवळ करण्याचा निर्णय घेतला. सभागृहात जाताना भाजपच्या ३२ सदस्यांचीच यादी घेऊन डॉ. भारत खटी दारावर उभे होते. यात कौशीकांच्या नावाचा उल्लेख कुठेही नव्हता. अखेरीस आपल्याला कुठेच पर्याय राहिला नाही, हे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामांच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून वर्षा कौशीक जिल्हा परिषदेत दाखल झाल्या व भाजपच्या बाजुने मतदान केले. आता कौशीकांना भाजपकडून फार काही मिळण्याची आशा नसल्याचे भाजपच्या अनेक नेत्यांनी सत्ता समिकरण जुळल्यानंतर स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. सोमवारच्या दिवसभरातील सत्ता स्थापनेचा सारा घटनाक्रमच आपल्यासाठी राजकारणातील मोठा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया आमदार क्रिष्णा गजबे यांनी दिली.