शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले सहा कुकर बॉम्ब नष्ट

By संजय तिपाले | Updated: May 6, 2024 14:54 IST

टिपागड परिसरात कारवाई : निवडणुकीदरम्यान घातपाताचा होता डाव

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके   पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड (ता. धानोरा) येथील टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई ६ मे रोजी  केली. 

माओवादग्रस्त गडचिरोलीत यावेळी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे झाली. तब्बल १५ हजार जवान मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात होते. त्यामुळे नक्षल्यांचा घातपाताचा डाव हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले होते.

टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवललेली स्फोटके नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवली होती.  दरम्यान, ६ मे रोजी  गोपनीय माहिती  आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलाविरोधी सी -६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फ़ोटकांनी भरेलेली ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप व इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी व ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले. सर्व टीम जावळच्या पोलिस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

गनपावडर अन् औषधे...टिपागड हा घनदाट झाडी असलेला डोंगर परिसर आहे. तेथील जमिनीतील स्फोटके शोधण्याचे काम कठीण होते, पण पोलिसांनी ते शाेधून काढले. त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेटही सापडले.   सुरक्षा जवानांचा घातपात करण्याच्या दृष्टीने नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडविण्याची तयारी केली होती, असे यातून समोर आले आहे.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBombsस्फोटकेGadchiroliगडचिरोली