लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील मूल मार्गावर गोकुलनगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी (दि.६) पहाटे दुचाकीवरून वाहतूक होत असलेल्या देशी दारूच्या पेट्या जप्त करून दोन आरोपींना अटक केली. या अनपेक्षित कारवाईने दारू वाहतूक करणाऱ्यांना हादरा बसला आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी दारू तस्करीत यापूर्वी कारागृहाची हवा खाऊन आलेला आहे.दीपक ढिवरू कुकुडकर रा.हनुमान वॉर्ड, गडचिरोली आणि मंगेश वासुदेव लोणारकर रा.फुले वॉर्ड, गडचिरोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी विजय वनकर पळून जाण्यात यशस्वी झाला.प्राप्त माहितीनुसार, दुचाकीवरून देशी दारूच्या पेट्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खासगी वाहनाने जाऊन सापळा लावला. यावेळी गोकुळनगरकडे जाणाºया मार्गावर दोन दुचाकींना दारूच्या पेट्यांसह रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुपर सॉनिक रॉकेट संत्रा ब्रँडच्या ९० मिलीच सहा पेट्या (६०० सिल बंद बाटल्या) आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत १ लाख २० हजार ६०० रुपये आहे.ही कारवाई दुय्यम निरीक्षक सी.एम. खारोडे, दुय्यम निरीक्षक के.एन. देवरे, सहाय्यक दु.निरीक्षक जी.पी. गजभिये, एस.एम. गव्हारे, व्ही.पी. शेंदरे, व्ही.पी. महाकुलकर आदींनी केली. पुढील तपास दु.निरीक्षक खारोडे करीत आहेत.मुरूमगाव प्रकरणात गाजलेला आरोपीया कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी दीपक कुकुडकर याच्यावर यापूर्वी दारू तस्करीसह इतरही गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी धानोरा तालुक्यातील मुरूमगावजवळच्या शेतात ठेवलेला मोठा दारूसाठा मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पकडल्यानंतर महिलांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दीपक कुकुडकर अनेक दिवस गजाआड होता. मात्र तेथून बाहेर येताच त्याने पुन्हा दारू तस्करीचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा आरोपीवर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
दिवसाढवळ्या सहा पेट्या दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST
दुचाकीवरून देशी दारूच्या पेट्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खासगी वाहनाने जाऊन सापळा लावला. यावेळी गोकुळनगरकडे जाणाºया मार्गावर दोन दुचाकींना दारूच्या पेट्यांसह रंगेहात पकडण्यात आले.
दिवसाढवळ्या सहा पेट्या दारू जप्त
ठळक मुद्देदुचाकीवरून वाहतूक : उत्पादन शुल्क विभागाकडून दोघांना अटक, एक पळाला