शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

आकांक्षी तालुका कार्यक्रमात सिराेंचा अव्वल, अहेरीचीही भरारी; नीती आयोगाकडून पहिल्या तिमाहीचे मूल्यांकन जाहीर

By संजय तिपाले | Updated: December 16, 2023 21:04 IST

देशाच्या पश्चिम विभागात समाविष्ट महाराष्ट्र,गुजरात गोवा,राजस्थान या चार राज्यांतून दुर्गम सिरोंचा तालुक्याने अव्वल तर अहेरीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

गडचिरोली : अविकसित व मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशव्यापी आकांक्षी तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यांतर्गत संबंधित भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या पश्चिम विभागात समाविष्ट महाराष्ट्र,गुजरात गोवा,राजस्थान या चार राज्यांतून दुर्गम सिरोंचा तालुक्याने अव्वल तर अहेरीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.केंद्र शासनाने २०१८मध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम जाहीर केला. त्याच धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम जानेवारी २०२३ मध्ये सुरु केला आहे. मागास जिल्ह्यांना विकसित करण्यासाठी आकांक्षी तालुका कार्यक्रम (एबीसी) या महत्त्वांकाक्षी उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जानेवारी २०२३ रोजी केली होती. देशभरातील ५०० तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात असून गडचिरोलीतील भामरागड, अहेरी व सिरोंचा या तीन तालुक्यांचा यात समावेश आहे. देशभरातील राज्यांचे क्षेत्रनिहाय विभाग तयार केले आहेत. क्षेत्र क्र. चार मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, गोवा व राजस्थानचा समावेश आहे.

नीती आयोगाने सप्टेंबर ते नोव्हेेंबर या पहिल्या तिमाहातील गुणांकन जाहीर केले आहे. यात सिरोंचा गटविकास अधिकारी कार्यालयाने चार राज्यांतून सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून अहेरीने द्वितीय स्थान मिळवले आहे. सिरोंचाचे गटविकास अधिकारी अनिकलकुमार पाटले व अहेरीचे गटविकास अधिकारी वरठे तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या पहिल्या तिमाहीत जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या तालुक्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान मिळवले ही समाधानाची बाब आहे. हे स्थान यापुढेही कायम टिकविण्याचा प्रयत्न राहील. पंचायत समितीस्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे. आकांक्षित कार्यक्रमाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत विविध विकासयोजना पोहोचतील व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा विश्वास आहे.- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.३९ दिशानिर्देशांचे गुणांकनदरम्यान, आकांक्षी कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता बालविकास,रोजगार, कृषी, नळयोजना, पशुसंवर्धन अशा विविध ३९ दिशानिर्देशांचा समावेश आहे. यांतर्गत केलेल्या कामाची माहिती नीती आयोगाकडे ऑनलाइन नोंदवली जाते, त्यानुसार दर तीन महिन्यांनी क्षेत्रनिहाय गुणांकन केले जाते. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीNIti Ayogनिती आयोग