शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

तळोधीत दारूचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

तळोधी येथे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिलपर्यंत गावातील स्वयंसेवकांनी नाकेबंदी केली. त्याकाळात पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर, समितीचे मिलींद मेडपीलवार आदींनी भेट देऊन दारूविक्रेत्यांना वारंवार तंबी दिली. परंतु या तंबीचा दारुविक्रेत्यांवर काहीच परिणाम झाला नाही. याबाबत चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी एवढ्या मोठ्या तालुक्यात एकाच गावाकडे लक्ष देऊ शकत नाही, असे लोकमत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर सांगितले होते.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : लॉकडाऊन असतानाही हिवरगावात सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे, व्यवसाय व रोजगार ठप्प असतानाही चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळोधी, हिवरगाव येथे दारूचा महापूर आहे. या भागात पोलिसांचे वाहन दररोज सायंकाळच्या सुमारास चकरा मारत असले तरी दारू विक्रेत्यांवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही.तळोधी येथे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिलपर्यंत गावातील स्वयंसेवकांनी नाकेबंदी केली. त्याकाळात पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर, समितीचे मिलींद मेडपीलवार आदींनी भेट देऊन दारूविक्रेत्यांना वारंवार तंबी दिली. परंतु या तंबीचा दारुविक्रेत्यांवर काहीच परिणाम झाला नाही. याबाबत चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी एवढ्या मोठ्या तालुक्यात एकाच गावाकडे लक्ष देऊ शकत नाही, असे लोकमत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर सांगितले होते. चामोर्शी ठाण्याचे अनेक पोलीस शिपाई दारूविक्रेत्यांच्या घरी ये-जा करताना दिसतात, असा आरोपही नागरिकांचा आहे. ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या ताफ्यासह गावात येत असतात. पोलिसांचा एक व्यक्ती गावात असतानाही त्यांना गावात दारुविक्री होत असल्याची माहिती का होत नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे. येथील बसथांब्याजवळ असलेल्या एका विक्रेत्याचा संपर्क तालुका व जिल्हास्तरावरील एका पोलीस अधिकाºयाशी आहे. त्यामुळे पोलीस काहीच करणार नाही, अशा आविर्भावात तो गावात वागताना दिसून येतो. काही पोलिसांचा आश्रय व पाठिंबा दारूविक्रेत्यांना निडर बनवत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून तळोधी व हिवरगावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी कली आहे.पांढरीभटाळ व लसनपेठवरुन पुरवठातळोधी व हिवरगावात पांढरीभटाळ व लसनपेठ येथून ३ ते ४ पुरवठादार दारुचा पुरवठा करतात. सध्या लॉकडाऊन असतानाही या गावांमध्ये सुरळीत पुरवठा होत आहे. काही पोलीस दर महिन्याला प्रत्येक दारुविक्रेत्याकडे येऊन चिरीमिरी घेऊन जातात, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई होणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी