शंकरपूर-आरमाेरी मार्गाला झुडपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:03+5:302021-02-05T08:48:03+5:30

आरमाेरी : तालुक्यातील ग्रामीण भागात पोहाेचणाऱ्या अनेक रस्त्यांच्या दुतर्फा मुरुम टाकण्यात आले नाही. त्यामुळे डांबरी रस्त्यालगत अनेक ठिकाणी ...

Shrubs on Shankarpur-Armari road | शंकरपूर-आरमाेरी मार्गाला झुडपांचा वेढा

शंकरपूर-आरमाेरी मार्गाला झुडपांचा वेढा

आरमाेरी : तालुक्यातील ग्रामीण भागात पोहाेचणाऱ्या अनेक रस्त्यांच्या दुतर्फा मुरुम टाकण्यात आले नाही. त्यामुळे डांबरी रस्त्यालगत अनेक ठिकाणी कचरा झुडपे वाढलेली आहेत. शंकरपूर-जाेगीसाखरा-आरमाेरी रस्त्याला झुडपांचा वेढा असल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे झुडपे ताेडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरमाेरी, देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर ते जोगीसाखरा तसेच जोगीसाखरा ते आरमोरी मार्गाची निर्मिती १९७५-७६ वर्षात पांदण रस्त्याच्या स्वरुपात झाली. त्यानंतर मातीकाम, खडीकरण व डांबरीकरणाची कामे झालीत. पण डांबरीकरणाच्या बाजूला मुरुम टाकण्यात आला नाही. तसेच रस्त्यालगतची झुडपे ताेडली नाही. वळणावर विरुद्ध दिशेने येणारी वाहने दिसून येत नाही. डुकरे व अन्य प्राणी रस्ता ओलांडताना वाहनांचा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यालगतची झुडपे ताेडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Shrubs on Shankarpur-Armari road