शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना युवती सेनेच्या शहरप्रमुखाची पतीने केली हत्या; मुले झोपेत असताना घडला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 11:43 IST

चारित्र्याच्या संशयावरून पोटात चाकूचे वार

-सिराज पठाण

कुरखेडा: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहरप्रमुख राहत ताहेमीम शेख (वय ३०) यांची चाकूने सपासप वार करून पतीने  निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना १५ सप्टेंबरला पहाटे घडली. चारित्र्याच्या संशयातून हे थरारक हत्याकांड झाल्याची माहिती असून आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताहेमीम वजीर शेख (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो मूळचा रजेगाव (जि. गोंदिया) येथील आहे. मात्र लग्नानंतर पत्नी राहत शेख समवेत कुरखेडा येथील आंबेडकर वॉर्डात सासरवाडीत राहत होता. त्यांना ८ व ५ वर्षे वयाची दोन आपत्ये आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे. १४ सप्टेंबरला रात्री याच कारणावरून दाम्पत्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. पहाटे अडीच वाजता राहत यांची पतीने चाकूने भोसकून हत्या केली. पोटात, गळ्यावर त्याने निर्दयीपणे वार केले. यात राहत यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी घरात राहत, त्यांचा पती ताहेमीम वजीर व दोन मुले असे चौघेच होते. मुले झोपेत असताना हा थरार घडला.

दरम्यान, तब्येत बरी नसल्याने राहत यांचे वडील नजत सय्यद उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांची पत्नीही सोबत दवाखान्यात होती. पहाटे चार वाजता चहा घेण्यासाठी नजत सय्यद हे घरी आल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या फिर्यादीवरून ताहेमीम वजीर शेखविरुद्ध कुरखेडा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वर्षा बोरसे, एस. आर. अवचार तपास करत आहेत.नदीवर अंघोळ करून गाठले पोलिस ठाणे

पत्नीची हत्या केल्यानंतर ताहेमीम वजीर शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यामुळे पोलिसही हादरून गेले. त्याला लगेच अटक करण्यात आली.१५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर

ताहेमीम वजीर शेख हा गुन्हेप्रवृत्तीचा आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात त्यास अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूPoliceपोलिस