तडजोडीने १०१ खटले निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:21 PM2018-12-08T22:21:17+5:302018-12-08T22:22:43+5:30

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली.

Settling 101 cases | तडजोडीने १०१ खटले निकाली

तडजोडीने १०१ खटले निकाली

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालत : ६४ लाख ७३ हजार रूपयांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली.
प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील न्यालयांमध्ये ८ डिसेंबर रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच इतर मामल्यांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुरेंद्र आर. शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. पॅनल क्रमांक १ वर जिल्हा न्यायाधीश वर्ग १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मेहरे, पॅनल क्रमांक २ वर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील, पॅनल क्रमांक ३ वर सह दिवाणी न्यायाधीश एन. सी. बोरफडकर यांनी काम पाहिले.
लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Settling 101 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.