शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'गोंडवाना'च्या पीएच.डी. प्रक्रियेत गंभीर नियमभंग ? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:18 IST

Gadchiroli : विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार अध्यादेश आणि अधिनियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करून, या प्रकरणात सखोल, निष्पक्ष व जलद चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाने अध्यादेशाचे उल्लंघन करून घेतलेल्या दोन संशोधकांच्या पीएच.डी. प्रक्रियेबाबत गंभीर नियमभंग झाला आहे. सिनेट सदस्यांनी यावर आक्षेप घेत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार अध्यादेश आणि अधिनियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करून, या प्रकरणात सखोल, निष्पक्ष व जलद चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.सिनेट सदस्य व आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. पी. अरुणाप्रकाश, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, सतीश चिचघरे, प्रा. स्वरूप तारगे, किरण गजपुरे, विजय घरत आणि डॉ. रूपेंद्रकुमार गौर या सिनेट सदस्यांनी संयुक्तपणे केली आहे.

विद्यापीठाच्या आचार्य कक्षातर्फे

  • २९ ऑगस्ट २०२५ रोजी समाजकार्य विभागातील दोन संशोधक विद्यार्थ्यांची पीएच.डी. परीक्षा घेण्यात आली. परंतु, ही प्रक्रिया ऑर्डिनन्स क्र. ८७ ऑफ २०१७ नुसार न घेतल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
  • नियमांनुसार कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक यांच्यावर अध्यादेशाचे पालन करण्याची जबाबदारी असतानाही या प्रक्रियेत जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • सिनेट सदस्य डॉ. रूपेंद्रकुमार गौर यांनी मा. कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना लेखी निवेदन देऊन नियमभंगाची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, संबंधित संचालकांनी त्रुटी मान्य करण्याऐवजी उलट डॉ. गौर यांना कलम ४८(४) अंतर्गत कारवाईची धमकी देत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगण्यात आले
  • अधिसभेचा सदस्य जेव्हा नियमभंग, गैरव्यवहार किंवा ४ भ्रष्टाचार अधोरेखित करतो, तेव्हा त्याला धमकी देणे हा अधिसभेच्या अधिकारात हस्तक्षेप ठरतो, असा दावा सदस्यांनी केला आहे. परीक्षा संचालकाने अधिसभा सदस्यास कारवाईची धमकी देणे हे थेट कायद्याचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

"यूजीसीच्या नियमावलीनुसार तसेच विद्यापीठ विद्या परिषदेच्या मान्यतेनुसार पात्र विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रक्रियेत कुठेही नियमांचे उल्लंघन झालेले नाही."- डॉ. अनिल हिरेखन, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ

English
हिंदी सारांश
Web Title : Gondwana University PhD process faces scrutiny for alleged rule violations.

Web Summary : Gondwana University faces allegations of PhD process violations. Senate members demand inquiry into ordinance breaches during researcher examinations. Accusations include procedural lapses and threats against a senate member who raised concerns. University denies wrongdoing.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षणuniversityविद्यापीठ