शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

‘कोरोना’च्या परिस्थितीवर पोलिसांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

या नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरिकांना थेट संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगता येतील. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून त्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस मदत करणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार आहे. त्यासाठी ३ पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १५ कर्मचारी तसेच वाहने व वाहन चालक असे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कारोना विषाणूमुळे (कोव्हिड-१९) उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचे निवारण आणि नियंत्रणासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. याअनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कोरोना विषाणू साथीच्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधक घालण्यासाठी व त्या संदर्भातील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यातून सामान्य नागरिकांना मदत व सहकार्य केले जाणार आहे.या नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरिकांना थेट संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगता येतील. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून त्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस मदत करणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार आहे. त्यासाठी ३ पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १५ कर्मचारी तसेच वाहने व वाहन चालक असे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.वैद्यकीय सेवेबाबत, अत्यावश्यक वस्तू पुरवठा करण्याच्या सेवेबाबत, संशयित रु ग्णाची माहिती देण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षाचा उपयोग नागरिकांना करता येईल. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यापैकी २५ लोकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला. अजून १२ जण निरीक्षणाखाली आहेत. एकाचा नमुना शुक्रवारी तपासून झाला, पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.विनाकारण फिरणाऱ्या ३२२ वाहनांवर कारवाईसंचारबंदी लागू असताना बेजबाबदारपणे बाहेर फिरत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया आणि हुल्लडबाजी करणाºया नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या संचारबंदीदरम्यान आतापर्यंत ३२२ वाहनांवर मोटार परिवहन कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांच्याकडून ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जीवनावश्यक साहित्याची अडचण भासू नये यासाठी शासनाने जीवनावश्यक साहित्याची सेवा देणाºया केंद्रांना सूट दिली आहे. परंतू काही बेजबाबदार नागरिक काही कारण नसताना शहरात फिरताना आढळून आले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.हेल्पपाईन क्रमांक कार्यान्वितया अनुषंगाने शुक्रवारपासून गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन क्र मांक सुरु करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना कोरोनासंबंधित कारणाविषयी काही अडचणी असल्यास त्यांनी दिलेल्या क्र मांकावर संपर्क करावे. नियंत्रण कक्षातील अधिकारी सदर हेल्पलाईनवरील तक्र ारीची दखल घेवून तत्काळ प्रतिसाद देतील. त्यासाठी ०७१३२-२२३१४९ आणि ०७१३२-२२३१४२ तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक ९४०५८४८७६७, ९४०५८४८७३६, ९४०५८४९१९७ वर संपर्क करता येईल. सदर सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.वाहतूक शाखेतर्फेमास्कचे मोफत वाटपसंचारबंदीचे गडचिरोली पोलीस दलाकडून काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. फक्त जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची मुभा दिली जात आहे. नागरिकांकडून देखील याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गडचिरोली पोलीस दलाच्या शहर वाहतूक शाखेतर्फे शुक्रवारी (दि.२७) जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणाºया व्यक्तींना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरातील नागरिकांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी व गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस