शिवसेनेची निदर्शने : शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जालना येथील एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ११ मे रोजी गुरूवारला येथील इंदिरा गांधी चौकात सायंकाळी ६ वाजता जाहीर निषेध केला. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष छाया कुंभारे, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, नदू कुमरे, शिवसैनिक रामकिरीत यादव, संजय आकरे, संदीप दुधबळे, एकनाथ उके, अंकुश धात्रक, प्रितम वरघंटे, त्र्येंबक खरकाटे, भास्कर मेश्राम, अथर्व कापकर, यश गण्यारपवार, चेतन कंदलवार, वेदांत कापकर, रंजीत हेमके, चेतन श्रीगलवार, कुणाल नंदावार, अजय ठाकरे, बादल गडपायले, मनीष मंगर, भुमेश्वर पवार, महेश दुधबळे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी छाया कुंभारे म्हणाल्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच नव्हे तर भाजपचे इतर पदाधिकारीही शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करतात. अशा वक्तव्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक म्हणाल्या, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांबाबत प्रसारमाध्यमांसमोर अपशब्द काढणे तसेच अपमानास्पद वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. जबाबदार नेत्याला हे वक्तव्य अशोभनीय आहे, असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
दानवेंविरोधात सेनेची घोषणाबाजी
By admin | Updated: May 13, 2017 02:06 IST