शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:57 IST

जिल्ह्यात २७८ शाळा : अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत.

तत्कालीन सरकारने 'गाव तिथे शाळा' हे धोरण राबविल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली. शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली. दरम्यान जिल्हयात १० पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास २७८ आहे. शासनाच्या मान्यतेनूसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यापूर्वी २० पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि.प.च्या शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता ही प्रक्रिया थांबली होती.

या तालुक्यातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकजिल्ह्यातील अहेरी उपविभागातील तसेच कोरची व धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात जि.प. शाळांची पटसंख्या कमी झाली असून याच तालुक्यांमध्ये १० च्या आत पटसंख्या असलेल्या अडीचशेपेक्षा अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक मानधन तत्त्वावर देण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व सिरोंचा या पाच तालुक्यात तसेच उत्तर भागातील कोरची आणि मध्य भागातील धानोरा तालुक्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

पं.स. स्तरावरून अर्ज जिल्ह्याच्या सात पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. सदर अर्ज आता पं.स.कडून जि.प.ला प्राप्त झाले आहे.

कर्मचारी लागले कामातविधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाचे कर्मचारी सदर कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेच्या कामात लागले आहेत. सोमवार किंवा मंगळवारपासून प्राप्त अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. 

"आधी २० च्या आतील पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक देण्यात येणार होते. मात्र शासनाच्या नव्या पत्रानुसार आता १० च्या आतील पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळतील." - विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) गड.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण