शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनातून आणले शाळकरी मुला-मुलींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:51 IST

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : एरवी लग्न वऱ्हाड असो की कोणताही कार्यक्रम, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी दिसल्यास पोलीस त्यांना अडविल्याशिवाय राहात नाही. शनिवारी मात्र उलटेच चित्र गडचिरोलीत पहायला मिळाले. अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी चक्क ट्रक, मिनी ट्रक, मेटॅडोअर अशा मालवाहू वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यात आले. एवढेच नाही तर काळी-पिवळी ...

ठळक मुद्देशिक्षक म्हणतात, पोलिसांनीच पाठविल्या गाड्या

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : एरवी लग्न वऱ्हाड असो की कोणताही कार्यक्रम, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी दिसल्यास पोलीस त्यांना अडविल्याशिवाय राहात नाही. शनिवारी मात्र उलटेच चित्र गडचिरोलीत पहायला मिळाले. अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी चक्क ट्रक, मिनी ट्रक, मेटॅडोअर अशा मालवाहू वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यात आले. एवढेच नाही तर काळी-पिवळी जीप व इतर अनेक प्रवासी वाहनांमधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास घडविण्यात आला.तब्बल ७ हजार श्रोत्यांपैकी ९० टक्के श्रोते विद्यार्थीच होते. जिल्ह्याच्या बहुतांश भागातून शाळकरी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला आणण्यासाठी पोलीस, सीआरपीएफची वाहने लावण्यात आली होती. पण ती मोजकीच असल्यामुळे ज्या शाळांकडे स्वत:च्या स्कूल बस आहेत त्यांनी त्या बसेसने विद्यार्थ्यांना आणावे असे ठरून त्यांच्या डिझेलचे पैसे पोलीस विभागाकडून देण्याचे ठरले. मात्र अनेक शाळांकडे स्कूल बसेसही नसल्यामुळे त्यांच्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था पोलीस विभागाने केली.प्राप्त माहितीनुसार, संबंधित पोलीस ठाण्यांना वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र काही ठाण्यांनी चक्क आपल्या हद्दीत चालणाऱ्या काळी-पिवळी गाड्या, मालवाहू गाड्यांच्या मालकांना त्यांची वाहने विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी भाड्याने मागितली. दुसरी वाहनेच उपलब्ध नसल्यामुळे नाईलाज म्हणून या वाहनांमधून विद्यार्थ्यांची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत आलेल्या काही शिक्षकांनी वाहनांबाबत विचारले असता, पोलिसांनी जी वाहने पाठविली त्या वाहनातून आम्ही आलो, ती वाहने आम्ही बुक केलेली नव्हती, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा पोलीस दलाकडे विचारणा केली असता आम्ही आमच्या स्तरावरून कोणत्याही शाळेला मालवाहू वाहने पाठविली नव्हती, असे सांगण्यात आले. त्यामुळे मालवाहू वाहने आली कुठून या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण झाले होते.श्रोत्यांना हवी होती संदेशाची प्रतआधीच बराच वेळ उन्हात ताटकळत बसलेले विद्यार्थी उन्हामुळे कासाविस झाले होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे अहिंसा संदेशाचे वाचन जरी त्यांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तरी त्यातीत मुद्दे त्यांच्या लक्षात राहतील का? याबद्दल मात्र शंका उपस्थित होत होती. संदेशाचे माईकवरून जाहीर वाचन करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्या संवादाची एक मुद्रित पत्र दिली असती तर किमान घरी जाऊनही त्यांना ते वाचन करून अहिंसेचे तत्व काय आहे हे समजून घेणे सोपे झाले असते, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमध्ये उमटत होती.चार ते पाच तास ताटकळत राहिलेसकाळी जवळपास ९ वाजतापासून विद्यार्थी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येण्यास सुरूवात झाली. मुख्य मैदानात येण्यापूर्वी त्यांच्यासाठी पोटभर मसाला भात आणि पिण्यासाठी भरपूर पाण्याचीही व्यवस्था केली होती. मात्र बारकोड लावून मुख्य मैदानात प्रवेश केल्यानंतर बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे दुपारी अडीच पर्यंत चार ते पाच तास त्यांना ताटकळत राहावे लागले.बारकोड रिडिंगमुळे नियोजन बिघडलेकार्यक्रमाला श्रोता म्हणून मैदानात उपस्थित राहणाºया प्रत्येक जणाची डिजीटल नोंद घेता यावी यासाठी प्रत्येकाच्या हातात बारकोड असलेला पट्टा घातला जात होता. मात्र तांत्रिक कारणामुळे बारकोडचे रिडिंग करण्यास कमालीचा विलंब लागत होता. दुपारी १२ पर्यंत अवघ्या १५०० जणांचा मैदानात प्रवेश झाला होता. अखेर बारकोड रिडींगच्या पद्धतीत थोडा बदल केल्यानंतर मग पटापट विद्यार्थ्यांना मैदानात प्रवेश मिळाला.