यावेळी संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, सचिव तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, सदस्य पुंडलिक भांडेकर, विलास ठोंबरे, अमित यासलवार, अनिल अधिकारी, प्रभारी बीडीओ सागर डुकरे, लिपिक देवांगणा सहारे उपस्थित होते.
काही प्रकरणे त्रुटींमुळे नामंजूर झाली आहेत. त्या प्रकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी लाभार्थीना बोलावून त्यांच्या समक्ष त्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना देण्यात आले. सदस्य विलास ठोंबरे यांनी श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, तसेच इतर योजनेतील लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून मानधन उपलब्ध झाले नसल्याने सदर लाभार्थ्यांची उपासमार होत आहे. थकलेले मानधन त्वरित अदा करण्यात यावे अशी सूचना सभेत केली. त्यावर तहसीलदार यांनी लाभार्थ्यांचे मानधन काही अडचणीमुळे थकलेले होते ते त्वरित वाटप करण्यात येईल, असे सांगितले.