शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

झटपट श्रीमंत हाेण्यासाठी रेती तस्करीचा गाेरखधंदा जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. झटपट श्रीमंत हाेण्यासाठी काही व्यावसायिक माेठ्याप्रमाणावर रेतीची चाेरी रात्रीच्या सुमारास करुन त्याची विक्री करीत आहेत. परिणामी शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

ठळक मुद्देरेती तस्करांचे अनेक फंडे : लिलावाअभावी चाेरटी वाहतूक वाढली

रत्नाकर बाेमीडवारचामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती खनन केले जात आहे. झटपट बक्कळ पैसा कमावून श्रीमंत हाेण्याचा अवैध धंदा सध्या चामाेर्शी तालुक्यात जाेमात सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. झटपट श्रीमंत हाेण्यासाठी काही व्यावसायिक माेठ्याप्रमाणावर रेतीची चाेरी रात्रीच्या सुमारास करुन त्याची विक्री करीत आहेत. परिणामी शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. गडचिराेली जिल्ह्यात २५ रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित हाेती. परंतु यातील १० घाटांचा लिलाव झाला. मात्र तेथेसुद्धा अद्यापही प्रत्यक्ष रेती खननाला सुरूवात झाली नाही. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे तालुक्यात रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. वैनगंगा नदीघाटावरुन सुरू असलेल्या रेती तस्करीची उच्चस्तरीय चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी. तसेच रेती घाटांचे लिलाव करुन सामान्य जनतेला वाजवी दरात रेती उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. 

रेती तस्करीत अदृश्य हात?चामाेर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील घाटांचे लिलाव न झाल्याने रात्रीच्या सुमारास रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परंतु या प्रकारात अनेकांचे अदृश्य हात असल्याची चर्चा आहे. रात्री रेतीचा उपसा करुन ढीग तयार करणे, नंतर महसूल प्रशासनाने ’ताे’ अवैध साठा जप्त करणे, अज्ञात व्यक्तीने रेती साठा करुन ठेवल्यामुळे ताे जप्त करुन लिलाव करणे. लिलाव प्रक्रियेत त्याच तस्करांनी भाग घेऊन साठा साेडविणे, असा गैरप्रकार सर्रास सुरू आहे, असे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बाेलले जात आहे. या सर्व अवैध प्रक्रियेत अदृश्य हात कुणाचे आहेत याचा शाेध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :sandवाळू