लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली ते सिरोंचा या मार्गावर ३ ते ९ मे दरम्यान २ लाख ५० हजार रूपयांचे सागवान वनाधिकाऱ्यांनी जप्त केले. वनाधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेडकर यांच्या उपस्थितीत ३ ते ९ मे दरम्यान वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गस्त घालून तस्करांचे सागवान लठ्ठे असरअल्ली - सिरोंचा मागार्पासून जंगलाच्या आत जप्त केले. यामध्ये पाच घन मीटर आकाराचे १० सागवान लठ्ठे आढळून आले. त्यांची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. ही कारवाई क्षेत्र सहाय्यक नवघरे, येनगंटीवार, येरूडे, पारखा, वनरक्षक जेवाजी बानोत, मेश्राम, गावडे, भुरसे, टेकाम, डुरकेवार, ओक्सा, निसार, गेडाम तसेच वनसेवक यांनी केली.
सिरोंचा वनक्षेत्रात सागवान लाकडे जप्त
By admin | Updated: May 10, 2017 01:31 IST