लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या औषध म्हणजे आयरन अॅण्ड फोलिक्स अॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे.रस्त्याच्या कडेला गोळ्या फेकल्याप्रकरणाची वैरागडच्या वैद्यकीय अधिकाºयांनी चौकशी सुरू केली आहे. वैरागड-आरमोरी मार्गावरील रांगी-धानोरा टी-पार्इंटजवळ रक्तक्षय रुग्णांना देण्यात येणाऱ्या गोळ्या व इतर आजारांवरील औषधी रस्त्यावर एका पिशवित बांधून फेकून देण्यात आली होती. आयरन अॅण्ड फोलिक्स गोळ्या शाळा, महाविद्यालयातून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेवनासाठी दिल्या जातात. ग्रामीण भागात आहारातून मूलभूत अन्नद्रव्य मिळत नाही. त्यामुळे या गोळ्या दवाखान्यात पुरवून प्रत्येक सोमवारी एक गोळी देण्याचा उपक्रम राबविल्या जातो. हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गरोदर व स्तनदा मातांना सुद्धा या गोळ्या आशावर्कर व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून वाटप केल्या जातात. मात्र वैरागडात अशा प्रकारे संबंधित लाभार्थ्यापर्यंत या गोळ्यांचे वाटप न करता त्या मुदतबाह्य झाल्यावर रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. या प्रकाराबाबत रुग्ण व नागरिकांनी प्रचंड नाराजी दर्शविली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आहे.कर्तव्यात कसूर करणारे कर्मचारी कोण?केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरोदर, स्तनदा माता, बालक व इतर नागरिकांसाठी विविध योजनांतर्गत अनेक आजारांवरील औषधी मोफत पुरविली जाते. राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. मात्र वैरागडसारखा औषधी फेकण्याचा प्रकार यापूर्वीही अनेक ठिकाणी उजेडात आला होता. सदर प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. वैरागडातील या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. मात्र हे कृत्य करणारे व कर्तव्यात कसूर करणारे ते कर्मचारी कोण आहेत, हे शोधून काढण्याचे आवाहन आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार काय, असा सवाल वैरागड भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
औषधी गोळ्यांचा रस्त्यालगत खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:35 IST
शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाºया औषध म्हणजे आयरन अॅण्ड फोलिक्स अॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे.
औषधी गोळ्यांचा रस्त्यालगत खच
ठळक मुद्देवैरागडातील प्रकार : रक्ताक्षयाच्या रुग्णांसाठी उपयोगी पडणाऱ्या गोळ्या फेकल्या