दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:51+5:30

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, डॉ.रामदास अंबटकर, आमदार डॉ.देवराव होळी, केंद्र शासनाचे सचिव, अतिरीक्त सचिव तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा आदी मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

The road-bridge will be completed in two years | दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार

दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार

Next
ठळक मुद्देनितीन गडकरी : ७७७ कोटींच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हयातील प्रमुख मार्गांची आणि पुलांची बांधणी करून पायाभूत सुविधा उभारण्याची ग्वाही देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा-मोहरा येत्या दोन वर्षात बदलेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील ७७७ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण समारंभप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, डॉ.रामदास अंबटकर, आमदार डॉ.देवराव होळी, केंद्र शासनाचे सचिव, अतिरीक्त सचिव तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा आदी मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ना.गडकरी यांनी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केलेल्या आलापल्ली ते भामरागड, आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचा उल्लेख करत त्यातील ३५ किमीच्या कामांना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. उर्वरित कामाला पुढील वर्षी मंजुरी दिली जाईल असेही ते म्हणाले. तसेच भामरागड तालुक्यातील १४ छोट्या पुलांच्या कामांसाठी ५० कोटी मंजूर करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी ना.विजय वडेट्टीवार यांचाही उल्लेख करत जिल्ह्यातील विक्रमी धान खरेदीची माहिती त्यांनी आपल्याला दिल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी या विकास कामांची मदत होईल, असे सांगितले. येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यात १०३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित असून त्यासाठी ४०२ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारने विकासावर भर दिला असून विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ना.व्ही. के. सिंग यांनीही सदर विकास कामांमुळे नक्षली प्रभाव कमी होईल असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नक्षलग्रस्त भागाला यामुळे चांगली कनेक्टिविटी मिळेल आणि महाराष्ट्र तेलंगानाशी जोडला जाईल असे सांगितले. खासदार अशोक नेते यांनीही या विकास कामांबद्दल ना.गडकरी यांचे आभार व्यक्त करताना काही अपेक्षा व्यक्त केल्या.

देसाईगंजपर्यंत मेट्रो, बांबूपासून रोजगार
ना.गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात देसाईगंजपासून ब्रह्मपुरीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला. यामुळे नागपूरची मेट्रोल देसाईगंजपर्यंत येईल आणि प्रवासाचा वेळ व इंधन बचत होईल, असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यांनी तांदळापासून इथेनॉल बनवणारा प्रकल्प आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनविण्याच्या प्रकल्पातून किमान १० हजार युवकांना रोजगार मिळू शकतो, असे सांगितले. मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या जिल्ह्यात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून हा जिल्हा विमान इंधनाचे हब बनू शकतो, असेही ना.गडकरी म्हणाले.

Web Title: The road-bridge will be completed in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.