शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गडचिरोलीत नद्या तुडुंब, तलाव 'ओव्हरफ्लो'; रस्त्यांचे झाले तळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:00 IST

दहा मंडळांत जोर'धार' : भामरागडला पुराचा वेढा, आरमोरीत घरावर कोसळली वीज गडचिरोलीत घरांत शिरले पाणी, नागरिकांची त्रेधातिरपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले तुटुंब भरून वाहत आहेत. तलाव ओव्हरफ्लो झाले असून शेत शिवारांमध्ये पाणी साचले आहे. भामरागड शहराला पुराचा वेळा पडला असून गडचिरोलीमध्ये सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुर्गम, अतिदुर्गम भागात ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे दळणवळण ठप्प झाले, परिणामी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.

जिल्ह्यात १७ व १८ ऑगस्ट रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली. १९ ऑगस्टलाही शहरासह परिसरात रिपरिप सुरूच होती. वैनगंगा, कठाणी नदी तुडुंब भरून वाहत असून भामरागडमध्ये पर्लकोटाच्या पुराचा जोर वाढला, त्यामुळे पाणी शहरात शिरले. संपूर्ण शहर जलमय झाले, त्यामुळे पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सिरोंचालगतच्या मेडिगड्डा धरणातून विसर्ग वाढल्याने परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. एटापल्ली, अहेरी, मुलचेरातील अनेक नाले पाण्याखाली गेले, त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद असून संपर्क तुटला आहे. देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, धानोरा, कोरची, आरमोरी येथे पावसाने दाणादाण उडाली. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर असून कुठे अनुचित घटना घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

कोठीत कोसळली भिंतकोठी (ता. भामरागड) येथे गणेश मोतकुरवार यांच्या दुकानाची भित कोसळली. साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने ते थोडक्यात वाचले.वीज कोसळल्याने सौर ऊर्जेच्या सुदैवाने ते थोडक्यात वाचले.

वीज कोसळल्याने सौर ऊर्जेच्या प्लेट फुटल्या आरमोरी : येथील बर्डी परिसरातील पेट्रोलच्या मागे राहत असलेले शिक्षक प्रकाश जंजाळकर यांच्या दुमजली घरावर सोमवारी मध्यरात्री वीज कोसळली. त्यांच्या घरच्या सोलर विद्युत व सोलर वाटरच्या प्लेटचे नुकसान झाले, सुदैवाने अप्रिय घटना टळली. सोमवारी मध्ये रात्री शहरात विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू होता. बर्डी येथील शिक्षक प्रकाश जंजाळकर यांच्या घरावर वीज कोसळली. त्यांच्या इमारतीला स्लॅबला मोठा खड्डा पडून सोलर प्लेट निकामी झाल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसूल अधिकाऱ्यांनी १९ रोजी पंचनामा केला.

या महामार्गावरील वाहतूक झाली ठप्पहेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्र. १३० डी (पर्लकोटा नदी), अहेरी-वटरा राज्यमार्ग (वटरा नाला), तळोधी-आमगाव महाल-विसापूर राज्यमार्ग (पोहार नदी), कुरखेडा-वैरागड राज्यमार्ग (सती नदी), चौडमपल्ली-चपराळा रस्ता, काढोली- उराड़ी रस्ता, शंकरपूर- डोंगरगाव रस्ता, कोकडी - तुळशी रस्ता, कोंढाळा -कुरुड-देसाईगंज रस्ता, पोलॉ वडधा रस्ता, भेंडाळा-बोरी-गणपूर रस्ता, हलवेर कोठी रस्ता, गडचिरोली- चांदाळा-गुरवळा राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

तालुकानिहाय पाऊसतालुका            पाऊस मि.मी.गडचिरोली          १२१.६धनोरा                 ८३.५देसाईगंज            १४७.०आरमोरी             १२८.३कुरखेडा              ६१.६कोरची                 ३९.०चामोर्शी               ६७.६.मुलचेरा               ६१.४अहेरी                  ४१.१सिरोंचा                ४२.२एटापल्ली            ६१.६भामरागड            १३०.०

पाण्यातून वाट काढताना झाले हालगडचिरोली शहरातील मूल मार्गावरील स्वामी विवेकानंद कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत होते. तसेच कन्नमवार नगर, अयोध्यानगर, गुरूकुंज कॉलनी, कारमेल शाळेच्या मागील परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. काही ठिकाणी घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शहरातील सखल भागातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यातून वाट काढताना शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल झाले.

फराडा येथे घर कोसळलेचामोर्शी तालुक्यातील फराडा येथील चंपत आडकू उंदिरवाडे यांचे घर पावसामुळे कोसळले. सुदैवाने कुटुंब दुसन्या खोलीत होते, त्यामुळे ते बचावले. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. यामध्ये घराचे ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी नामदेव चंदनखेडे यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल पाठवला आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर