शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

दुर्गम भागातील शाळांचा समितीकडून आढावा

By admin | Updated: December 26, 2016 01:34 IST

विद्या परिषदेने नियुक्त केलेल्या ३२ समिती सदस्यांनी भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम

शिक्षकांमध्ये धास्ती : सोयीसुविधा, विद्यार्थी, शिक्षक उपस्थितीबाबत जाणली माहिती गडचिरोली : विद्या परिषदेने नियुक्त केलेल्या ३२ समिती सदस्यांनी भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन समस्यांचा आढावा जाणून घेतला. समिती सदस्यांमध्ये राज्याचे उपसंचालक विक्रमसिंह यादव, सहायक संचालक गावकर यांच्यासह इतर ३२ सदस्यांचा समावेश आहे. समिती सदस्यांनी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती, शिक्षक संख्या व उपस्थिती, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वितरणाची स्थिती, शालेय पोषण आहराचा दर्जा, साहित्य व शालेय पोषण आहार बनविताना घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता गृह, शौचालय व्यवस्थापन, गणित पेटी व वापर, शाळाबाह्य विद्यार्थी, शालेय अभिलेख व अद्यावतीकरण किचन शेड, गृहभेटी, विद्यार्थी प्रतिक्रिया, वर्ग निरिक्षण, लोक सहभाग आदींची माहिती जाणून घेतली. समिती सदस्यांनी पालकांसोबतही चर्चा केली. यावेळी बहुतांश पालकांनी शिक्षक नियमितपणे शाळेमध्ये येत नसल्याची गंभीर समस्या समिती सदस्यांसमोर उपस्थित केली. काही शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. येथील दोनपैकी एकच शिक्षक येतात. पावसाळ्यात तर दोन्ही शिक्षक गैरहजर राहत असल्याची गंभीर बाब समिती सदस्यांसमोर उपस्थित केली आहे. संबंधित शिक्षकांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची तपासणी विद्या परिषदेच्या मार्फतीने करण्यात आली असल्याने शिक्षकांमध्येही आपल्यावर कोणती कारवाई होईल. अशी भिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)