लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नवनियुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी २७ आॅगस्ट रोजी भामरागड तालुक्याचा दौरा करून नुकसानग्रस्त धान व इतर पिकांची पाहणी केली. कृषी योजनांचा आढावा अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतला.येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्षेत्रीय कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेती शाळा व प्रकल्पाचे जिवो टगिंग करावे, असे निर्देश बऱ्हाटे यांनी दिले. तालुक्यात कृषी विभागाच्या योजनाची कशा पध्दतीने अंमलबजावणी केली जात आहे, याची माहिती जाणून घेतली. मनरेगा अंतर्गत शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत आरेवाडा येथील मंजुळा लटारे यांच्या शेतात प्रक्षेत्र भेट देऊन झाडांची पाहणी केली. त्यानंतर शेततळा व श्री पध्दत तसेच पट्टा पध्दतीने रोवणी केलेल्या धान पिकाच्या क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यासोबत चर्चा केली. दिलीप लटारे यांच्या शेतातील फळबागेची तपासणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी कौटकर, मंडळ कृषी अधिकारी नेटके, देशमुख, मसराम, कापगते, मडावी, नलिनी सडमेक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.भामरागड तालुका व लाहेरी भागात १९ ते २२ आॅगस्ट दरम्यान अतिवृष्ट झाली. पुराच्या पाण्यामुळे बºयाच क्षेत्रावरील धानपीक पाण्याखाली आले. या नुकसानीची कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी कर्मचाºयांनी वेळीच पंचनामे करून तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापरकृषी विभागाच्या पुढाकाराने जिल्हा मानव विकास कार्यक्रमातून भामरागड तालुक्यातील काही शेतकºयांना कृषी यंत्र व अवजारे मिळाली. या यंत्र व अवजारांचा शेतकरी वापर करीत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हांटे यांनी या यंत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. फळबाग लागवड प्र-क्षेत्र व ठिबक संचाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. दरम्यान बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शासन व प्रशासन आपल्याला मदत करणार आहे. सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाºयांना सहकार्य करावे, पिकांवरील कीड व रोगांचा वेळीच उपाययोजना करावे असे सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्षेत्रीय कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेती शाळा व प्रकल्पाचे जिवो टगिंग करावे, असे निर्देश बऱ्हाटे यांनी दिले. तालुक्यात कृषी विभागाच्या योजनाची कशा पध्दतीने अंमलबजावणी केली जात आहे, याची माहिती जाणून घेतली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
ठळक मुद्देयोजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली : भामरागड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी